💥परभणी जिल्हा प्रहार जनशक्ती पक्षाच्या रास्ता रोको आंदोलनाला यश....!


💥धार रोडवर नविन विद्युत पोल टाकण्यास सुरूवात, रस्त्याच्या मधोमध असलेले पोल काढले जाणार💥

परभणी (दि.११ आगस्ट) - शहरातील धार रोडवर चार ते पाच वर्षा पूर्वी सिमेंट क्रॉक्रीट रस्त्याचे काम करण्यात आले परंतु रस्त्याचे काम करण्यापूर्वी रस्त्याच्या मधोमध असलेले विद्युत पोल काढण्यात आले नव्हते. यामुळे दोन पदरी रस्ता असूनही तो अर्धवटच वापरात होता. शिवाय या पोलमुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अपघात देखील होत होते. रस्त्याच्या मधोमध असलेले हे विद्युत पोल तात्काळ काढण्यात यावेत व रस्ता मोकळा करून देण्यात यावा या मागणीसाठी एका महिन्या पूर्वी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात धार रोड येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी आंदोलन करणाऱ्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले होते. आंदोलनाच्या वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाने एका महिन्याच्या आत रस्त्याच्या कडेला नवीन विद्युत पोल बसवून त्या नवीन विद्युत पोलवर विद्युत पुरवठा स्थलांतर करण्यात येईल आणि त्यानंतर रस्त्याच्या मधोमध असलेले संबंधित पोल तात्काळ काढण्यात येतील असे लेखी आश्वासन दिले होते.


सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या लेखी आश्वासना नुसार सार्वजनिक बांधकाम विभाग परभणी यांच्याकडून ४५ लाख रुपये महावितरण ला वर्ग करण्यात आले आणि आज महावितरण कडून धार रोडवरील रस्त्याच्या बाजुला नविन विद्युत पोल बसविण्याचे काम चालू झाले असून विदयुत पुरवठा स्थानांतरीत केल्या नंतर पंधरा दिवसाच्या आत रस्त्याच्या मध्यभागी असलेले विद्युत पोल काढले जाणार आहेत.

प्रहार जनशक्ती पक्षाने केलेल्या रस्ता रोको आंदोलनाचे हे यश असून प्रहारच्या आंदोलनानंतरच मागील तीन-चार वर्षापासून कुंभकर्णाच्या झोपेत असलेले सार्वजनिक बांधकाम विभाग खडबडून जागे झाले असून व संबंधीत गुत्तेदाराने रस्त्याच्या मध्यभागी असलेले पोल काढण्यासाठी ४५ लाख रूपयाचा निधी महावितरणला हस्तांतरीत केला होता. प्रहार जनशक्ती पक्षाच्या रास्ता रोको आंदोलनामुळेच धार रोडवरील रस्त्याचे मध्यभागी असलेले पोल निघणार असल्यामुळे धार रोडवरून वाहातुक करणाऱ्या समसापूर, साटला, धार, मांगणगांव, मटकऱ्हाळा, संबर, सावंगी खुर्द, साडेगांव गावच्या गांवकऱ्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे आभार मानले आहेत. आज संबंधीत कामाची पाहाणी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, उपजिल्हा प्रमुख रामेश्वर जाधव, तालुका प्रमुख ज्ञानोबा काळे, शहर प्रमुख धर्मेद्र तुपसमिंद्रे, मटकऱ्हाळा शाखा प्रमुख उध्दव गरूड, शेख बशीर, सय्यद युनूस, सय्यद महेमुद इ उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या