💥शहीद डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्या खुनाच्या तपासात होत असलेल्या दिरंगाई बाबत अंनिसच्या वतीने निवेदनाव्दारे मागणी....!


💥पूर्णा तहसिलदारांच्या मार्फत मुख्यमंत्र्याकडे अनिसच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली मागणी💥

पूर्णा (दि.२२ आगस्ट) - महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ.नरेद्र दाभोळकर यांचा २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यात गोळी घालून खुन करण्यात आला आहे या घटनेला ९ वर्ष ओलांडून गेले आहे परतू अद्यापही तपासात दिरंगाई होत आहे लवकरात लवकर तपास करावा या मागणीचे निवेदन पूर्णा तहसिलदाराच्या मार्फत मुख्यमंत्र्या कडे निवेदनाव्दारे करण्यात आली तसेच पुरोगामी संघटने मध्ये काम करणारे अड गोविद पानसरे प्रा एम.एम. कलबुर्गी पत्रकार गौरी लंकेश याची हत्या करण्यात आली या बाबत तपासात दिरंगाई करण्यात येत असुन या चौघाच्या तपासा बदल राज्य सरकार व केंद्र सरकारने आपली भुमिका स्पस्ट करावी खुनात सहभागी असलेल्या सर्व सघटना आणि सुधारांना तातडीने अटक करण्यात यावी.

 सामाजिक संघटनेत काम करणाऱ्या लोकांच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी कडक कायदा करावा या संदभात चर्चा करण्यासाठी पंतप्रधान यांची भेटव तारीख मिळण्यासाठी शिफारस करावी अशी मागणी करण्यात आली. या निवेदनावर महाराष्ट्र अधश्रद्धा निर्मूलन समिती पूर्णा शाखाचे कार्यकर्ते गणेश पाटील आशोक एंगडे डॉ. दिलीप शृंगार पुतळे डॉ. आदिनाथ इंगोले शेख नसीर, गिरीष कदमा जय एंगडे भुषण भुजबळ अजय खंदारे आदिच्या स्वाक्षरी आहेत....,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या