💥हल्लेखोर सरपंचावर पत्रकार हल्ला विरोधी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची पत्रकार संघाची मागणी....!


💥लोकशाही मार्गाचा अवलंब करून जनमतातून निवडून आलेले लोकप्रतिनिधीच करतात पत्रकारांवरील हल्लेखोरांचे समर्थन💥


पुर्णा (दि.३० आगष्ट) - तालूक्यातील ताडकळस पोलिस हद्दीतील मौ.माखणी येथील दै.सामनाचे पत्रकार जनार्धन आवरगंड यांच्यावर दि.२३ आगष्ट २०२२ रोजी माखणी ग्रामपंचायचे सरपंच गोविंद हरीभाऊ आवरगंड व इतर यांनी मागील काळात दिलेल्या बातम्यांमध्ये नाव का टाकले नाही तसेच गावातील शाळेच्या निकृष्ट बांधकामाची माहिती का मागीतली याचा संताप मनात बाळगून ओल्या दुष्काळा संदर्मात गावचा अहवाल निरंक आल्याची चर्चा गावात करीत बदणामी का केली असे म्हणत गावातील मारोती मंदिरा समोर सिनेस्टाईल पध्दतीने एखाद्या गुंडाला शोभेल अश्या पध्दतीने  मारहाण केली त्यांच्या या गुंड प्रवृत्तीचा निषेध करीत ताडकळस मराठी पत्रकार परिषदेच्या पत्रकारांनी ताडकळस पोलिस स्थानकाचे सहा.पो.नि.विजय रामोड यांना निवेदन देऊन सरपंच गोविंद आवरगंड यांच्यावर पत्रकार हल्ला विरोधी कायदा अंतर्गत तर ताडकळस परिसरातील 'सुनिल सर चिमटे मित्र परिवार' नामक व 'गण गण गणात बोते' या वाट्सअप ग्रुपवर पत्रकार जनार्धन आवरगंड यांनी खंडणी मागीतली त्यामुळे अश्या पत्रकाराला मारायलाच पाहीजे अशी चिथावणीखोर व बदणामीकारक भाषेचा वापर केल्यामुळे तसेच खंडनी मागीतल्या संदर्भात कुठलाही सबळ पुरावा नसतांना अपप्रचार करून बदणामी केल्या प्रकरणी संबंधित वाट्सअप ग्रुप ॲडमीनसह असा खोटा प्रचार करणाऱ्या सचिन पाटील नामक व्यक्तीवर देखील सखोल चौकशी करून सायबर क्राईम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली असून हल्लेखोर सरपंच गोविंद आवरगंड त्यांच्या विरोधात पत्रकार हल्ला विरोधी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे.

********************************************

💥लोकशाही मार्गाचा अवलंब करून जनमतातून निवडून आलेले लोकप्रतिनिधीच करतात पत्रकारांवरील हल्लेखोरांचे समर्थन :-


     लोकशांहीचा चौथा आधारस्तंभ समजल्या जाणाऱ्या ग्रामीण भागातील पत्रकारावर एखाद्या गुंडाला लाजवेल अश्या पध्दतीने हल्ला करून आवाज दाबण्याचा प्रयत्न सातत्याने होत असतांना त्या पत्रकाराच्या मदतीला धावून येण्याऐवजी लोकशाही मार्गाचा अवलंब करीत जनमतातून निवडून येणारे निर्लज्ज लोकप्रतिनिधी तसेच राजकीय पक्ष पदाधिकारी देखील हल्लेखोरांचे समर्थन करीत त्यांची हिंमत वाढवत असल्यामूळे जनहीतासाठी परखड लिखाण करणाऱ्या व सर्वसामान्य जनतेला वेळोवेळी न्याय मिळवून देणाऱ्या निर्भीड पत्रकारांचा कोणी वालीच नसल्याचे निदर्शनास येत आहे.

 जिल्ह्यात जनमतातून निवडून येणारे लोकप्रतिनिधीच लोकशाहीचा घात करणाऱ्या व लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ समजल्या जाणाऱ्या पत्रकारांवर खुनी हल्ले करणाऱ्या व संपूर्ण कुटुंबास जिवे मारण्याच्या धमक्या देणाऱ्यांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहत त्यांना पाठींबा देत असल्यामुळे जिल्ह्यात गुन्हेगारी तसेच राजकीय दहशतवादी प्रवृत्ती जोमाने फोफावत असल्याचे निदर्शनास येत असून जिल्ह्यात एखाद्या सर्वसामान्य नागरीकावर अन्याय झाल्यास त्याला न्याय देण्यासाठी पोलिस प्रशासनाला फोन करणारे कमी आणि सर्वसामान्यांसह पत्रकारांवर अन्याय करणाऱ्याला वाचवण्यासाठी पोलिस प्रशासनावर दबावतंत्राचा वापर करणारे लोकप्रतिनिधी जास्त झाल्यामुळे या जिल्ह्यात लोकशाहीसह लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाची उघडपणे निर्घृण हत्या करण्याचे प्रकार होतांना दिसत आहेत

*********************************************

 ताडकळस पोलिस स्थानकाच्या हद्दीतील मौ.माखणी येथील दैनिक सामना या वर्तमानपत्राचे पत्रकार जनार्धन आवरगंड यांच्यावर हल्ला करणाऱ्या हलेखोरांवर कडक शासन करण्यात यावे तसेच खंडणी मागितली असा सबळ पुरावा नसतानाही अपप्रचार करून बदनामी करणाऱ्या 'सुनिल सर मित्रपरीवार' व  'गण गण गणात बोते' या व्हाटसप ग्रूप ॲडमिन सह खोटा प्रचार करणाऱ्या ग्रुप सदस्याची  सखोल चौकशी करुन सायबर क्राइम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा तालूका पत्रकार संघटनेच्या वतीने तीव्र अंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदनावर फेरोज पठाण, देवानंद नावकिकर , शिवाजी शिराळे ,धम्मपाल हनवते ,बाळासाहेब राउत ,शमिम पठाण ,  शेख शेहजाद , गजानन नाइकवाडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत....

💥राजकीय पक्ष पदाधिकारी/लोकप्रतिनिधींच्या दबावाला बळी पडून कठोर कारवाई करण्यास टाळाटाळ ? 


पत्रकार जनार्धन आवरगंड हल्ला प्रकरणी ताडकळस पोलिस स्थानकाचे सहा.पो.नि.विजय रामोड यांना लेखी स्वरूपात पत्रकार आवरगंड यांनी तक्रार दिल्यानंतर देखील सपोनि.रामोड यांनी प्रकरणाचे गांभीर्य न ओळखता थातूरमातूर एनसी दाखल करून या प्रकरणातील हल्लेखोर आरोपी सरपंच गोविंद आवरगंड यांना वाचवण्याचा केविलवाणा प्रकार केल्यामुळे संबंधित आरोपीची हिंमत कमालीची वाढल्याचे निदर्शनास येत असून या प्रकरणात हल्लेखोर सरपंचावर गुन्हा दाखल करण्यात येवू नये याकरिता सपोनि.रामोड यांच्यावर राजकीय दबावतंत्राचा वापर झाल्याचेही स्पष्ट होत आहे.... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या