💥नांदेड- हुबळी रेल्वेचा विस्तार गोवा राज्या पर्यंत करण्याची मराठवाडा रेल्वे प्रवासी संघटनेने केली मागणी....!


💥या मागणी बाबत मराठवाडा रेल्वे प्रवासी संघटनेने दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाला पाठवले निवेदन💥

परभणी / प्रतिनिधी

नांदेड विभागातून दमरे ने सुरू केलेल्या साप्तहिक नांदेड-हुबळी रेल्वेचा विस्तार गोवा पर्यंत करण्याची मागणी मराठवाडा रेल्वे प्रवासी संघटनेने केली आहे. या बाबत महासंघाचा वतीने एक निवेदन दमरे ला पाठवले असून त्यात म्हटले आहे की मागील काही महिन्यापासून प्रवासी संघटना मराठवाडा विभागातून गोवा, मंगळूर किंवा कन्याकुमारी पर्यंत जोडणारा रेल्वेची सतत मागणी करत आहे.

 त्या मागणीला अनुसरून  दक्षिण-मध्य रेल्वे विभागाने लोंढा जंक्शन येथे इंजिन बदलण्याची अडचणी पुढे करून पंढरपूर मार्गाने गोवा ऐवजी नांदेड-हुबळी दरम्यान विशेष रेल्वे चालवली आहे. काही दिवस प्रायोगिक तत्वावर चालवल्यानंतर नांदेड-हुबळी रेल्वेला मोठा प्रतिसाद मिळाला होता. मात्र आता 13 आॅगस्ट पासून घोषित नांदेड-हुबळी रेल्वेचा मार्ग बदलण्यात बदलण्यात आली असून पंढरपूर ऐवजी बीदर-गुंतकल-होसपेट  मार्गे घोषणा केली आहे. सदर रेल्वे मार्गाने गोवाकडे जाताना इंजिन बदलण्याची  गरज नसून सध्या घोषित नांदेड-हुबळी रेल्वेचा  हुबळी चा पुढे गोवा/मंगळूर/कन्याकुमारी पर्यंत विस्तार करण्यात यावेत. स्वातंत्र होऊन 75 वर्ष झाली तरीही मराठवाडयातून गोवा/केरळ जाण्यासाठी अजूनही रेल्वे नाहीए त्यामुळे या गाडीचा विस्तार किमान गोवा पर्यंत करावे व सदर रेल्वेला कायमस्वरुपी करण्याची मागणी रेल्वे प्रवाशी महासंघाने केली आहे.

*नांदेड-हुबळी नवीन रेल्वे सुरू करा :-

परळी-मिरज आणि मिरज-हुबळी या दोन्ही सवारी रेल्वे गाड्यांना एक्सप्रेस मध्ये रुपांतरीत करण्यात आले आहेत, तर दोन्ही रेल्वे गाड्यांना एकत्रित करून सदर रेल्वे ला परळी चा पुढे नांदेड पर्यंत विस्तार करून नांदेड-हुबळी दरम्यान कायमस्वरूपी नवीन दैनंदिन जलद रेल्वे सुरू करण्याची मागणी मराठवाडा रेल्वे प्रवाशी महासंघाचे अरुण मेघराज, राजेंद्र मुंडे, प्रा सुरेश नाईकवाडे, रितेश जैन, डा. राजगोपाल कालानी, रवींद्र मूथा, श्रीकांत गडप्पा, रुस्तम कदम, दयानंद दीक्षित, कादरीलाला हाशमी, विठ्ठल काळे इत्यादी ने केली आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या