💥परभणी तालुक्यातील मौजे धसाडी येथे भारतीय किसान संघाची ग्राम सभा संपन्न.....!


💥शेतकऱ्यांचे विकासासाठी शेतकर्त्यांनी संघटीत होऊनच शासनाला जाब विचारावा लागेल - दादा लाड

परभणी (दि.२३ आगस्ट) - मा. कैलासजी धाकड अखिल भारतीय कार्यकारीणी सदस्य तथा महाराष्ट्र प्रांत पालक व दादा लाड संघटनमंत्री महाराष्ट्र व गोवा तथा अखिल भारतीय अमंत्रीत सदस्य [गुजराथ ] यांचे उपस्थितीत परभणी तालुक्यातील मौजे धसाडी येथे भारतीय किसान संघाची ग्रामसभा संपन्न झाली या ग्रामसभेस गावातील बहुसंखेने तरुण कार्यकर्ते उपस्थित होते.


या प्रसंगी मा. दादा लाड यांनी भारतीय किसान संघ एक गैर राजकीय देशव्यापी शेतकऱ्यांनी, शेतकरी, शेतमजूर व शेती व्यवसायासी निगडित असलेल्या सर्व समाजबांधवासाठी कशा प्रकारे काम करते यावर उपस्थिताना मार्गदर्शन केले तसेच शेतकऱ्यांचे विकासासाठी शेतकर्त्यांनी संघटीत होऊनच शासनाला जाब विचारावा लागेल तरच शासनकर्ते शेतकऱ्यांच्या समशाकडे लक्ष देतील असे नमुद केले . तसेच सध्यस्थितीत शेतकऱ्यांचा केवळ सतास्थापने पुर्ताच विचार होतो व नंतर शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाते . म्हणून शेतकऱ्यांनी आता थोडे अंतरमुख होऊन गैर राजकिय असलेले भारतीय किसान संघाची कास धरून आपल्या रास्त मागण्यासाठी अवाज उठवण्याची गरज आहे असा विचार उपस्थितांचे समोर मांडला. संघटनाचा परीणाम कसा होतो हा विचार मांडताना त्यांनी शासकीय कर्मचारी संघटीत होऊन शासनास वेठीस धरून आपले प्रश्न सोडवून घेतात तर मग शेतकरी भारतीय किसान संघाचे रुपाने संघटीत झाल्यास त्यांचे प्रश्नांचा विचार शासनाला करावाच लागेल असे नमुद केले .

मा. कैलासजी धाकड यांनी ग्रामसभेस संभोदीत करताना सुद्धा शेतकरी संघटीत होणे गरजेचे आहे असेच सुचविले . तसेच महात्मा गांधीजीचे ग्राम विकासाचं स्वप्न साकारण्यासाठी प्रथम शेतकरी समृद्ध झाला तरच गांव समृद्ध हा विचार कार्यकर्त्यांचे समोर ठेवला. मौजे धसाडी ता.परभणी येथील भारतीय किसान संघाच्या वतीने आयोजीत ग्रामसभा यशस्वी करण्यासाठी श्रीविष्णू प्रकाशराव शिंदे, श्री नरहरी शिंदे,श्री विष्णू सदाशिवराव शिंदे , बळीरामजी जाधव , सचिन शिंदे, दिलीप शिंदे, सिद्धेश्वर शिंदे, केशव शिंदे, विठ्ठल शिंदे, महेश दुधाटे , शिवराम शिंदे, शिवाजी शिंदे आदी तरून कार्यकर्त्यांच्या अविरत  परीश्रमामुळे व "एकसंघ विचार " या सुत्रांनी एकमेकांचे मने जिंकण्याच्या विशेष गुणामुळे हा कार्यक्रम यशस्वी करून केंद्राचे कार्यकर्त्यांचे मनावर वेगळा ठसा उमटविल्याचे सर्व श्रेय या कार्यकर्त्यंचेच . शेवटी सामुहीक पसायदान घेऊन कार्यक्रमाची सांगता संपन्न झाली .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या