💥जिंतूर येथे पतंजली योग समितीच्या वतीने जडीबुटी दिन साजरा....!


💥पूज्य आचार्य बालकृष्ण जी यांचे जन्म दिवसा निमित्त💥

जिंतूर प्रतिनिधी  / बी.डी. रामपूरकर

आज सकाळी पतंजली भारत स्वाभिमान चे जिल्हा प्रभारी श्री शेपसर यांचे मार्गदर्शनाखाली आज प्रयाग कन्स्ट्रक्शन येथे पूज्य स्वामी आचार्य बाळकृष्ण जी यांच्या वाढदिवसानिमित्त जडीबुटी दिवस साजरा करण्यात आला.यावेळी जडीबुटींची वृक्षारोपण करण्यात आले. त्याचबरोबर पूज्य आचार्य बालकृष्णाची यांच्या वाढदिवसानिमित्त होम हवन व प्रार्थना करण्यात आली.


त्याच बरोबर जिल्हा कोषाध्यक्ष वसंतराव देशमुख, जिल्हा संघटन मंत्री श्री यादवराव साखरे, पतंजली न्यास तालुका प्रभारी उद्धव देशमुख ,किसान चे तालुका प्रभारी लखोजी जाधव, योगशिक्षक बाळासाहेब रामपूरकर, सचिन रायपत्रीवार, महिला प्रभारी सौ शुभांगी जाधव ,सौ मीनाताई डोंबे, सौ डॉ. सविता वाघमारे, सौ दराडे, प्रा. डॉ.अशोक वैद्य, भुजंग देवकर, पुरुषोत्तम अंभोरे, केंद्रे, राम रेघाटे, दत्तात्रय तळेकर आदी पतंजली न्यास कार्यकारणी सदस्य उपस्थित होते.

दिनांक 06 ऑगस्ट 2022 रोजी पतंजली योगपीठ हरिद्वार येथील प.पु. स्वामी आनंद देव जी महाराज हे जिंतूर  येथील शेप सर यांचे प्रयाग कन्स्ट्रक्शन या ठिकाणी दुपारी 11:30 ला येणार आहेत. तरी सर्व पतंजली न्यास सोबतच पाचही समित्यांचे सर्व कार्यकारणी सदस्य व सर्व योगशिक्षक यांनी उपस्थित रहावे असे आव्हान सर्व पतंजली न्यास ‌ समिती तर्फे करण्यात आले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या