💥पत्रकार भागवत चव्हाण यांना मास्टर ऑफ जर्नालीझमच्या अंतिम वर्षामध्ये यश...!


💥त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वस्तरातून होत आहे अभिनंद💥

जिंतूर प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर

भागवत लक्ष्मण चव्हाण परभणी येथील रवींद्रनाथ टागोर वृत्तपत्रविद्या व जनसंवाद महाविद्यालय व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी नांदेड येथून मास्टर ऑफ जर्नालीझमच्या घेण्यात आलेल्या अंतिम वर्षाच्या परीक्षेत विशेष प्राविण्यासह घवघवीत यश संपादन केले. भागवत चव्हाण यांचे शिक्षण याआधी बीएससी बीएड आणि डीएड परभणी व मंठा येथून झाले. तसेच लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय परतुर येथून मास्टर ऑफ आर्ट मराठी विषयांमध्ये झाले. आता मास्टर ऑफ जनरलीझम या अंतिम वर्षामध्ये यश संपादन करून पुढे ते पत्रकारितेमध्ये डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी करणार असल्याचे वृत्तपत्र माध्यमाशी बोलताना सांगितले.

त्यांच्या या यशाबद्दल रवींद्रनाथ टागोर वृत्तपत्रविद्या व जनसंवाद विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डी. जे सानप, डॉ. मुजीब शेख, प्रा. मधुकर डोईफोडे, प्रा. राऊत, प्रा. संतोष भालके, प्रा. समीर कुरेशी, तसेच जिंतूर इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या सर्व पदाधिकाऱ्याकडून त्यांचा गुणगौरव करण्यात आला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या