💥पुर्णा तालुक्यात ओला दुष्काळ जाहिर करा व सरसकट पंचणामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्या...!


💥पुर्णा तालुका वकील संघाने तहसिलदार यांच्या मार्फत शासनाकडे निवेदनाद्वारे केली मागणी💥


पुर्णा (दि.०८ आगस्ट) - तालुक्यात मागील दिड महिन्यापासून सतत पाऊस पडत असल्यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन,कापूस,तुर,मुग आदी पिकांसह हळद तसेच फळ भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्यामुळे महसुल प्रशासनाने तात्काळ सरसगट पंचणामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयें नुकसान भरपाई देऊन तालुक्यात ओला दुष्काळ जाहिर करावा अशी मागणी पुर्णा तालुका वकील संघाच्या वतीने तालुकाध्यक्ष ॲड.दिनेश रामकृष्ण काळे यांच्या नेतृत्वाखालील वकील संघाच्या शिस्टमंडळाने आज सोमवार दि.०८ आगस्ट २०२२ रोजी तहसिलदार पल्लवी टेमकर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन एका निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

पुर्णा तालुका वकील संघाच्या वतीने तहसिलदार टेमकर यांना देण्यात आलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की पुर्णा तालुक्यात मागील दिड महिण्यापासून सर्वत्र सतत पाऊस पडत आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उभी पिक बाधीत झालेली आहे त्यामुळे तहसिलदार तथा महसुल प्रमाणे बाधीत झालेल्या पिकांचे सरसगट पंचणामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार अनुदान देण्यासह तालुक्यात ओला दुष्काळ जाहिर करावा ज्यामुळे शेतकरी येणाऱ्या रब्बी हंगामातील पेरणीसह आपल्या कुटुंबाचा उदर्निवाह करू शकतील तसेच यावर्षी पिकांवरील औषधी/खत बि-बियान महाग झाल्यामुळे पेरणीसाठी शेतकऱ्यांचा जास्तीतजास्त खर्च झालेला आहे त्यामुळे याही वर्षी शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्यामुळे शासनाने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी ५० हजार रुपयें आर्थिक मदत देणे आवश्यक असल्याचेही वकील संघाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले असून या निवेदनावर ॲड.बि.आर.लोखंडे,ॲड.एस.जी.सोनी,ॲड.के.पी.पारवे,ॲड.एस.एन.सुर्यवंशी,ॲड.ए.बी.शेख,ॲड.शिंदे,ॲड.एच.व्ही.गायकवाड,ॲड.वाळवंटे,ॲड.एम.बी.जोगदंड,ॲड.व्ही.दुधाटे,ॲड.डि.एस.सोनकांबळे,ॲड.एस.एस.खरे,ॲड.आर.एन.जोगदंड,ॲड.ए.के.कदम,ॲड.एस.एस.काळे आदींच्या स्वाक्षरी आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या