☀️त्यावेळी अजित पवार यांच्या वाढदिवसा निमित्त लखनसिंघ लांगरी यांनी गुरुद्वारा तखत सचखंड हजूरसाहिब येथे अरदास केली☀️
नांदेड (दि.01 ऑगस्ट) : राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे नेते माजी उप मुख्यमंत्री अजीत पवार हे नुकतेच अतिवृष्टि परिस्थितीची पाहणी करण्यासाठी नांदेड दौऱ्यावर आले होते. यावेळी रविवारी (ता. 31 ) रोजी पहाटे राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे शहर उपाध्यक्ष सरदार लखनसिंघ लांगरी यांनी अजीत पवार यांची विश्रामगृह येथे भेट घेऊन त्यांचा सिरेपाव आणि गुरुद्वाराची प्रतिमा देऊन सत्कार केला.
काही दिवसापूर्वी अजीत पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. त्यावेळी अजित पवार यांच्या वाढदिवसा निमित्त लखनसिंघ लांगरी यांनी गुरुद्वारा तखत सचखंड हजूरसाहिब येथे अरदास केली होती. अजित पवार यांचे आरोग्य स्वस्थ राहावे आणि त्यांना समाजसेवा करण्याची शक्ति लाभावी अशी प्रार्थना करण्यात आली होती. याभेटीत लखनसिंघ लांगरी यांनी त्यांना सिरेपाव भेंट देऊन वाढदिवसाच्याही शुभेच्छा दिल्या आहे. त्यांच्या सोबत पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. अजीत पवार यांनी गुरुद्वारात अरदास केल्यामुळे लखनसिंघ लांगरी यांना धन्यवाद दिले.....
0 टिप्पण्या