💥शेतकऱ्यांनी अनावश्यक पिक संजीवके यांचा पिक संरक्षणामध्ये वापर टाळावा...!


💥असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विजय लोखंडे यांनी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे💥

परभणी (दि.18 आगस्ट) : सद्यस्थितीत खरीप हंगाम 2022 मधील कापूस, सोयाबीन, तूर इत्यादी पिकांची पेरणी चालू झालेली असून, शेतकरी भविष्यात आपल्या पिकांची उत्तम वाढ व्हावी व किड रोगापासून पिकांचे संरक्षण व्हावे या उद्देशाने विविध किड्नाशाके खरेदी करून फवारणी करीत आहेत. सदर किड्नाशकाच्या फवारणीबाबत काही शेतकरी पिकांची संजीवके किंवा पिकांचे टॉनिक म्हणून मिळणारी विविध औषधी खरेदी करून फवारणीसाठी वापरत असल्याचे निदर्शनास येत आहे.

वास्तविक पिकाची संजीवके किंवा टॉनिक हि कृषी शास्त्रज्ञांच्या सल्ल्यानेच आवश्यकता असल्यास फवारणीची आवशकता असते. परंतु काही शेतकरी पिकांची चांगली वाढ होऊन उत्पादन मिळावे या आशेने महागडी संजीवके / टॉनिक वापरून आपल्या शेतीच्या खर्चात वाढ करीत आहेत. तरी शेतकऱ्यांनी कुठल्याही जाहिरात / भूलथापाना बळी न पड़ता या संजीवकांचा / टॉनिक खरेदीचा मोह टाळावा. तसेच कृषी विद्यापीठाने शिफारस केलेली किड्नाशाके व सुक्ष्म मूलद्रव्ये खते वापरून आपल्या शेतीचा खर्च कमी करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विजय लोखंडे यांनी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या