💥नांदेड-जालना ‘समृध्दी’ महामार्गा करीता हस्तांतरीत केल्या जाणार्‍या शेतजमीनींचा शेतकऱ्यांना योग्य मावेजा द्यावा..!


💥परभणी जिल्ह्याचे माजी खासदार सुरेश जाधव यांनी केली मागणी💥

परभणी (दि.12 आगस्ट) : नांदेड ते जालना या नियोजित समृध्दी महामार्गा करीता हस्तांतरीत केल्या जाणार्‍या शेत जमीनीच्या मोबदल्यापोटी शेतकऱ्यांना राज्य सरकारने सर्वसामान्य योग्य त्या प्रमाणात मावेजा द्यावा अशी मागणी शिवसेनेच्या शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख तथा परभणी जिल्ह्याचे माजी खासदार अ‍ॅड.सुरेश जाधव यांनी केली आहे.

            नांदेड ते जालना या समृध्दी महामार्गास राज्य सरकारद्वारे मंजूरी मिळाली आहे. परंतु, या नियोजित महामार्गालगत काही पुढारी व काही अधिकार्‍यांनी विकत घेतलेल्या शेतजमीनीतून महामार्ग वळवून शासनाची शुध्द लुट करण्याचा डाव आखला आहे. नांदेड जिल्ह्याच्या हद्दीत केवळ 19 किलो मीटर अंतराच्या शेत जमीनींच्या मावेजापोटी तब्बल 11409.67 कोटी रुपयांचा मावेजा वाटप केला जाणार आहे.  जालना जिल्ह्याच्या हद्दीतून 66 किलो मीटरचा नवीन महामार्ग जात असून मावेजापोटी 3854.68 कोटी रुपये मिळणार आहेत. ही रक्कम म्हणजे जालना जिल्ह्यातील शेतकर्‍यांवर अन्याय करणारी आहे, असे जाधव यांनी म्हटले आहे.

             परभणी जिल्ह्यातून 93 किलो मीटर शेतजमीनी जावूनही शेतकर्‍यांना केवळ 5408.50 कोटी रुपये मावेजापोटी मिळणार आहेत. शेतजमीनी जिरायती दाखवल्याने व शेतकरी वर्गाची तक्रार अधिकारी ऐकत नसल्याने सर्वाधिक जमीनी जावूनही मावेजा मात्र पुरेशा प्रमाणात मिळत नाही, असे चित्र आहे. एकप्रकारे तो शेतकर्‍यांवर अन्यायच आहे.

             जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, अधिकारी त्याकडे कानाडोळा करीत आहेत. त्यामुळेच या प्रस्तावित आराखड्याची चौकशी करावी. शासनाची होणारी लूट थांबवावी  व परभणी जिल्ह्यातील शेतकर्‍यांना न्याय मिळवून द्यावा, असे जाधव यांनी म्हटले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या