💥हिंगोली जिल्ह्यातील मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर ग्रामस्थांनी पकडली बेकायदेशीर अवैध देशी दारू....!


💥हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातल्या पानकनेरगाव येथी घटना💥 

* शिवशंकर निरगुडे : हिंगोली 

हिंगोली जिल्ह्यातील मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर ग्रामस्थांनी अवैध देशी दारू पोलिसांना पकडून दिली आहे सेनगाव रिसोड महामार्गावर अवैद्य रित्याची देशी दारू ची राजरोजपणे वाहतूक चालु आहे विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवर असलेले पानकनेरगाव गेल्या अनेक दिवसापासून अवैध्य रीतीने दारू विकणाऱ्या वर कारवाईचे प्रमाण वाढले असता त्यातच सरपंच कुलदीप देशमुख यांनी अक्षरशा मोटर सायकल वरून जाणाऱ्या दोन व्यक्तींना पकडून विचारपूस केली असता त्यांच्या पिशवीमध्ये अवैद्य बनावट देशी दारू आढळल्याने तात्काळ पानकनेरगाव चे बीड जमादार शेख खुदुस यांना कळवले व पोलिसांच्या ताब्यात दिले पानकनेरगाव हे विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवर असल्यामुळे या भागामध्ये अवैध देशी दारूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढल्याने पान कनेरगावचे गावकरी आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले आहे पानकनेरगाव येथील  महिला सरपंच यांचे पति कूलदिप देशमुख यांनी ही अवैध बनावट बेकायदेशीर अवैध दारू पकडून दिली आहे.

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध देशी दारू पार्सल बॉय गावात नेऊन देतात  या संदर्भात अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेचे उपजिल्हा प्रमूख गजानन देशमुख यांनी या संदर्भात बातम्या प्रसारित केल्या वर पानकनेरगाव येथील काही दारू विक्री करणाऱ्या वर सेनगाव पोलिसांनी या संदर्भात कार्यवाही देखिल करण्यात आली होती मात्र लगेच दुसऱ्या दिवशी पार्सल बॉय हें गावात दारू आणून देत होते यांचा अर्थ सेनगाव पोलिसांचा दारूविक्रेत्यांनी काहीच धाक राहिला नाही ग्रामस्थाना दारू पकडून द्यावी लागत आहे मग पोलिस कर्मचारी काय करत आहेत असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.

सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव येथील 3आगष्ट रोजी  सहाच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर बेकायदा बनावट असलेली देशी दारूचा बाॅक्स वाढोणा येथील एक व्यक्ती पान कनेरगाव येथे संतोष खंदारे यांच्या कडे घरपोच करत असतांनाच कुलदीप देशमुख यांनी व्यक्ती व बाॅक्ससह पोलीसांच्या ताब्यात दिले या धाडशी कामगिरी मूळे कूलदिप देशमुख यांचे  पानकनेरगांवात कौतुक होत आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या