💥पुर्णेतील दैनिक देशोन्नतीचे पत्रकार गजानन हिवरे यांना मातृशोक...!


💥मातोश्री माजी नगरसेविका सौ.लक्ष्मीबाई नारायणराव हिवरे यांचे वयाच्या ५८ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन💥

पुर्णा (दि.०८ आगस्ट) - येथील दैनिक देशोन्नतीचे पत्रकार गजानन हिवरे यांच्या मातोश्री तथा पुर्णा नगर परिषदेच्या शिवसेना माजी नगरसेविका सौ.लक्ष्मीबाई नारायणराव हिवरे यांचे वयाच्या ५८ व्या वर्षी आज सोमवार दि.०८ आगस्ट २०२२ रोजी दुपारी ०४-०० वाजेच्या सुमारास अल्पशा आजाराने नांदेड येथील खासगी रुग्णालयात दुःखद निधन झाले आहे.

त्यांचा अंत्यसंस्कार उद्या मंगळवार दि.०९ आगस्ट २०२२ रोजी पूर्णा येथील लिंगायत स्मशानभूमीत सकाळी १०-०० वाजता होणार आहे.त्यांच्या पश्चात पती,मुलगी,दोन मुले,सुन,नातवंडे,जावई असा मोठा परिवार आहे.....

" इश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो व हिवरे कुटुंबास या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो हिच इश्वरा चरणी प्रार्थना...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या