💥भाजपा पदाधिकारी यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त केले अभिवादन....!


💥अण्णाभाऊ साठेंनी आपल्या शाहिरी व साहित्यातूनउपेक्षितांच्या,कामगारांच्या लढाईचा आवाज बुलंद केला - लक्ष्मण  बुधवंत 

जिंतूर प्रतिनिधी / बी.डी.रामपूरकर

जिंतूर येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पूर्णाकृती पुतळ्यास भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण बुधवंत यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या शाहिरी आणि साहित्यप्रतिभेच्या माध्यमातून उपेक्षितांच्या, कामगारांच्या लढाईचा आवाज बुलंद केला, समाजमन जागृत केले, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत प्राण फुंकले. असे प्रतिपादन भाजपाचे जिंतूर तालुका अध्यक्ष लक्ष्मण बुधवंत यांनी येथे प्रसार माध्यमासी बोलताना केले.

यावेळी भाजपचे जिंतूर तालुकाध्यक्ष लक्ष्मण बुधवंत, डॉ पंडित दराडे, प्रमोद कराड, आबा खेत्रे, तालुका सरचिटणीस रमेश मोहिते, शहराध्यक्ष दत्ता कटारे, मनोहर सातपुते, सचिन रायपत्रीवार, राजेश थिटे, सुमेर सुर्यवंशी, किशोर जाधव, मतीन तांबोली, आकाश चराटे, युवराज घनासावांत, बंटी जाधव, अमोल देशमुख, ऋषी मुधवर, आदी सह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थिती होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या