💥पुर्णा तालुक्यातील ताडकळस पोलिस स्थानकाच्या हद्दीतील माखणी गावात सरपंचाने केला पत्रकारावर हल्ला....!


💥माखणी गावाचा दुष्काळा संदर्भातील अहवाल निरंक असल्याचे गावातील शेतकऱ्यांना का सांगतोस असे म्हणून केला हल्ला💥


पुर्णा (दि.२४ आगस्ट) - ग्रामीण भागातील पत्रकारांना सर्वसामान्य जनता शेतकरी बांधवांशी बांधिलकी जोपासत जनहीतवादी पत्रकारीता करणे किती धोकादायक झाले आहे यांचा प्रत्यय पुर्णा तालुक्यातील ताडकळस पोलिस स्थानकाच्या हद्दीत असलेल्या माखणी गावातील दैनिक सामना या वृत्तपत्राचे पत्रकार जनार्धन बालासाहेब आवरगंड यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणावरून पुन्हा एकदा उजागर झाले असून माखणी गावातील ओल्या दुष्काळा संदर्भातील अहवाल निरंक असल्याचे गावातील शेतकऱ्यांना का सांगतोस असे म्हणून माखणी ग्रामपंचायतचे सरपंच गोविंद आवरगंड व सहकारी महाजन बबनराव आवरगंड या दोन आरोपीतांनी आमच्यासह गावाची बदणामी का करतोस असे म्हणून पत्रकार जनार्धन आवरगंड यांच्यावर गावातील मारोती मंदिरा समोर उभे असतांना मंगळवार दि.२३ आगस्ट २०२२ रोजी सकाळी १०-०० वाजेच्या सुमारास जोरदार हल्ला चढवून शिविगाळ करीत थापडबुक्क्यांनी मारहाण करीत जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली.

या संदर्भात सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील ताडकळस पोलिस स्थानकाच्या हद्दीत असलेल्या माखणी गावासह संपूर्ण ताडकळस सर्कल मध्ये मागील जुलै महिण्यात सतत जोरदार पाऊस झाला यावेळी अतिवृष्टी मुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकांची नासाडी झाली या संदर्भातील माखणी गावातील समितीतील सरपंच/ग्रामसेवक/तलाठी ओल्या दुष्काळा संदर्भातील अहवाल चुकीचा पाठवल्यामुळे माखणी गावातील दुष्काळा संदर्भात अहवाल निरंक आल्याची माहिती दि.२२ आगस्ट २०२२ रोजी पत्रकार जनार्धन आवरगंड यांना कृषी सहाय्यकां मार्फत कळाली त्यामुळे आपल्या गावातील शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळाच्या अनुदानापासून वंचित राहावे लागेल याविषयी काहीतरी केले पाहिजे असा निर्मळ हेतू नजरेसमोर ठेवून पत्रकार जनार्धन आवरगंड यांनी सरपंच गोविंद आवरगंड यांना मोबाईल वरून व गावातील काही शेतकऱ्यांना देखील प्रत्यक्ष भेटून माहिती दिली नेमका याच गोष्टींचा राग अनावर होऊन पित्त खवळलेल्या सरपंच गोविंद आवरगंड यांनी काल दि.२३ आगस्ट २०२२ रोजी सकाळी १०-०० वाजता गावातील मारोती मंदिरा समोर धरून मारहाण करीत कुटुंबासह जिवे मारण्याची धमकी दिली या घटने संदर्भात पत्रकार जनार्धन आवरगंड यांनी ताडकळस पोलिस स्थानकात काल २३ आगस्ट २०२२ रोजी रात्री १०-०० वाजेच्या सुमारास दिलेल्या फिर्यादी वरून आरोपी सरपंच गोविंद हरिभाऊ अवरगंड व सहआरोपी महाजन बबनराव आवरगंड दोघे राहणार माखणी ता.पुर्णा यांच्या विरोधात ताडकळस पोलिस स्थानकाचे सहाय्यक पोलिस निरिक्षक विजय रामोड यांनी प्रकरणाचे गांभीर्य न ओळखता ३२३,५०४,५०६,३४ अंतर्गत किरकोळ स्वरूपाची एनसी दाखल करीत संबंधित आरोपींना वाचवण्याचे कृत्य केल्याचे निदर्शनास येत असून त्यामुळे पत्रकार जनार्धन आवरगंड यांच्यासह त्यांचे कुटुंब भयभीत झाल्याचे निदर्शनास येत असून पत्रकार आवरगंड यांनी सरपंच गोविंद आवरगंड यांच्यापासून कुटुंबाला देखील धोका असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या