💥आर्थिक साक्षरतेशिवाय समाजाचा विकास अशक्य आहे - इंजि. अविनाश कोठाळे


💥सहकारातून छोटे छोटे लघुउद्योग उभारले पाहिजे असेही यावेळी बोलतांना ते म्हणाले💥 

पूर्णा (दि.२२ आगस्ट) -  आर्थिक साक्षरतेशिवाय समाजाचा विकास अशक्य आहे असे प्रतिपादन इंजि. अविनाश कोठाळे यांनी केले. ते येथील स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयातील  अर्थशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या व्याख्यानात बोलत होते. श्री. गुरुबुध्दी स्वामी शिक्षण संस्थेच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाचा सत्कार आणि अर्थशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित केलेले व्याख्यान या दुहेरी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष तथा श्री. गुरुबुध्दी स्वामी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष उत्तमराव कदम हे होते. पुढे बोलताना कोठाळे म्हणाले की वर्तमानात शेतकऱ्यांना सावकार शाहीच्या जाचातून मुक्त करायचे असेल तर आर्थिक साक्षरता अभियान राबविले पाहिजे. सरकारच्या विविध आर्थिक योजना आहेत त्याची माहिती शेतकरी कामगार व कष्टकरी यांना समजावून सांगितल्या पाहिजेत तसेच सहकारातून छोटे छोटे लघुउद्योग उभारले पाहिजे. असे झाले तर कोणीच उपाशी राहणार नाही असेही त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.

 यावेळी  श्री. गुरुबुध्दी स्वामी शिक्षण संस्थेचे नवनिर्वाचित कार्याध्यक्ष प्रमोद एकलारे ,सचिव अमृतराज कदम, कोषाध्यक्ष उत्तमराव कदम, जेष्ठ संचालक साहेबराव कदम, प्राचार्य डॉ के. राजकुमार व प्रमुख पाहुणे म्हणून नुतन विद्यामंदिर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हेमंत जामकर यांचाही सत्कार करण्यात आला. महाविद्यालयाची विद्यार्थिनी श्रध्दा कदम हीने दहा हजार मीटर चालणे या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होऊन पाचवा क्रमांक मिळविल्या बद्दल महाविद्यालयाच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते तिचाही सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ के. राजकुमार, अमृतराज कदम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पाहुण्यांचे स्वागत संगीत विभागाच्या प्रा. सुजाता घन यांच्या स्वागत गीताने करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक सचिव प्रोफेसर डॉ रामेश्वर पवार यांनी मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ संजय कसाब यांनी केले तर आभार व्याख्यानाचे आयोजक अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. विजय भोपाळे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.विजय भोपाळे, प्रा.नंदा चारलवाड, प्रा.डॉ.सुरेखा भोसले , प्रा.डॉ. संजय कसाब, प्रा.डॉ.भीमराव मानकरे, प्रा.डॉ.भारत चापके, प्रा.डॉ.प्रभाकर किर्तनकार, प्रा.डॉ. प्रकाश सूर्यवंशी, प्रा.डॉ मारोती भोसले,प्रा.डॉ जितेंद्र देशमुख, प्रा.डॉ. अशोक  कोलंबीकर प्रा.डॉ.विलास काळे,प्रा.डॉ.शारदा बंडे ,प्रा.डॉ. दीपमाला पाटोदे,प्रा. वैशाली लोणे,प्रा. भराडे, प्रा.वाव्हळे, सूर्यकांत भोसले, दत्ता कदम आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या