💥हिंगोली जिल्ह्यातील कोंढूरच्या मुली होणार उपग्रह प्रक्षेपनाच्या साक्षीदार....!


💥श्रीहरीकोटा येथील कार्यक्रमासाठी १० विद्यार्थिनीची निवड💥


* शिवशंकर निरगुडे : हिंगोली

स्वातंत्र्याच्या अमृतमोत्सवानिमित्त इस्रोने यंदा स्वातंत्र्यदिनी देशभारतील ७५ शाळांमधील ७५० निवडक विद्यार्थिनीच्या उपस्थित आजादीसॅट उपग्रह प्रक्षेपित करण्याचे नियोजन केले. आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातील श्रीहरिकोटा येथून त्यांचे प्राक्षेपन केले जाणार आहे. या ७५० विद्यार्थ्यांमध्ये कळमनुरी तालुक्यातील कोंढूर   येथील जिल्हा परिषद शाळेच्या दहा विद्यार्थिनींची निवड झाली. त्या बद्दल जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शनिवार ३०/०७/२०२२ रोजी कोंदुर शाळेला भेट देत निवड झालेल्या विद्यार्थिनी व शिक्षकांचे आभिनंदन केले. 


        देशाच्या अमृत महोत्सवी दिनानिमित्त इस्त्रोद्वारे श्रीहरिकोटा  इथून आझाढी सॅट या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात येणार आहेत. आझाढीसॅट हे सरकारी शाळांना प्रोहत्साहन देण्यासाठी महत्वाकांक्षी उपग्रह मोहीम आहे या उपग्रहाच्या ऐतीहासिक क्षानांचे साक्षीदार होणयासाठी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कोंढूर येथील विद्यार्थिनी निवड स्पेस किड्स इंडिया यांच्याकडून करण्यात आली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त निती आयोगाकडून देशातील विद्यार्थिनी सहभागी होण्यासाठी ऑनलाइन लिंकद्वारे आवाहन करण्यात आले होते. जिल्हा आधिकऱ्यानी या विद्यार्थिनींचे आभिनंदान केले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, शिक्षण आधिकरी संडीपकुमार सोनटक्के, गटशिक्षणाधिकारी दत्ता नंदे, शिक्षण विस्तार अधिकारी गंगाधर बिरमवाड, श्रीमती सुगंधे, शाळा व्यवस्थापक  समितीचे संजय पतंगे, मारुती पतंगे, बाळासाहेब पतंगे, राजीव पतंगे, सुनील हरण, नितीन नवले यांच्या सह गावकर्यांची उपस्थिती होती. 


* यांची झाली निवड :-

       निकिता पतंगे, अयोध्या पतंगे, ऐश्वर्या पतंगे, समृद्धी देशमुख, गायत्री पवार, कोमल पांचाळ, शिवकन्या पोटे, अंजली पतंगे, संस्कृती लेकुळे, ज्ञानेश्वरी पवार यांनी या साठी नोंदणी केली होती. ऑनाईन प्रशिक्षणानंतर विद्यार्थिनी शिक्षक शंकर लेकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रोग्रामिंग इन्स्ट्रोल करून त्यांची पाठवणी केली होती. या प्रक्रियेत राज्यामधील आणेक शाळांच्या विद्यार्थिनीनी सहभाग नोंदवला होता. यामधून उपग्रहाचे प्रक्षेपण कार्यक्रमाकरिता देशातील ७५ शाळांमधील ७५० विद्यार्थिनीची निवड करण्यात आली आहे.

* हिंगोली जिल्ह्यासाठी अतिशय अभिमानस्पद बाब :-

या उपक्रमासाठी राज्यात दोन शाळांची निवड करण्यात आली आहे या मध्ये हिंगोली जिल्ह्यातील कोंढूर सारख्या ग्रामीण भागातील विध्यार्थीनीची निवड झाल्याने ही बाब जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे यासाठी आम्ही नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थीना स्पर्धेच्या युगात प्रगत केली जाणार आहे .*शंकर लेकुळे मार्गदर्शक शिक्षक*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या