💥परभणी जिल्हाधिकारी कार्यालय आयोजित स्वातंत्र्य संग्रामाची प्रश्न मालिका स्पर्धा.....!


💥फास्टेट फिंगर फर्स्टचे अनोखे पारितोषिक💥


परभणी (दि.११ आगस्ट) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय परभणीच्या वतीने विविध नावीन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.  “स्वातंत्र्य संग्रामाची प्रश्न मालिका स्पर्धा” अंतर्गत विजेत्यांना पारितोषिक देण्यात येत आहे. स्पर्धेतील चूरस आणखी वाढविण्याच्या दृष्टीने  दि. ९ ऑगस्टपासून फास्टेस्ट फींगर फर्स्ट हे नवे पारितोषिक असणार आहे. दररोज सर्वात प्रथम अचूक उत्तर देणार्‍या स्पर्धकास हे बक्षीस देण्यात येणार आहे. याकरीता प्रत्येक स्पर्धकाची ऑनलाईन उत्तर दिल्याची वेळ संगणकात नोंदविली जाणार असून त्या आधारे सर्वात प्रथम अचूक उत्तर देणाऱ्या स्पर्धकाची निवड केली जाणार आहे. दररोजच्या अचूक उत्तरांपैकी दोन स्पर्धकांच्या बक्षीसासोबत हे तिसरे बक्षीस प्रदान करण्यात येणार आहे.


         जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या संकल्पनेतून ५ ते  १५  ऑगस्ट या  कालावधीत भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या विषयावर आधारीत “स्वातंत्र्य संग्रामाची प्रश्नमालीका स्पर्धा” जिल्हाधिकारी कार्यालय परभणी यांचे मार्फत घेण्यात येत आहे. या नाविन्यापूर्ण स्पर्धेमध्ये ऑनलाईन पद्धतीने दररोज दुपारी १२ वा परभणी जिल्ह्याच्या संकेतस्थळावर "प्रश्न मंजुषा' या शिर्षकाखाली (www.parbhani.gov.in/prashnamalika/) एक प्रश्न विचारण्यात येत आहे. या प्रश्नाचे उत्तर त्याच दिवशी दुपारी १२ ते सायं. ५ या कालावधीत त्याच लिंकवर भरून सादर करावयाचे आहे. स्पर्धेतील विजेत्यांचा दुसर्‍या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते सत्कार करण्यात येत आहे. स्पर्धेचा दि. 10 ऑगस्टपर्यंतचा दैनंदिन तपशील व विजेते खालीलप्रमाणे आहेत

            यात दि. ५ ऑगस्ट  रोजी भारताची राष्ट्रीय प्रतिज्ञा कोणी लिहिलेली आहे ? Who wrote the National Pledge of India? हा प्रश्न विचारण्यात आला होता. त्याचे अचूक उत्तर होते, पैदिमरी व्यंकट सुब्बाराव (पी. व्ही. सुब्बाराव) Paidimari Venkat Subbarao (P.V. सुबबाराव. यादिवशी एकूण ७१४ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला असून त्यापैकी ६५१ स्पर्धकांनी अचूक उत्तर दिले. यापैकी विनोद नारायणराव शिंदे  व शाम तुकाराम टेंगसे यांना विजेते घोषित करण्यात आले. 

दि. ६ ऑगस्ट रोजी आझाद हिंद सेनेमधील महिला रेजिमेंटचे नाव काय होते? What was the name of the women’s regiment in Azad Hind Sena? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्याचे अचूक उत्तर होते, झांसी की रानी रेजिमेंट  Jhasi Ki Rani रेजिमेंट. या दिवशी एकूण ६५५ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला असून २८७ स्पर्धकांनी अचूक उत्तर दिले. यापैकी वाघ रामेश्वर दगडोबा व असलम खान मन्नान खान यांना विजेते घोषित करण्यात आले. 

दि.७ ऑगस्ट रोजी ‘इंडिया  वीन्स फ्रीडम” या पुस्तकाचे लेखक कोण? Who is the author of the book 'India wins freedom'?  हा प्रश्न विचारण्यात आला होता. त्याचे अचूक उत्तर,  मौलाना अबुल कलाम Maulana Abul कलाम हे होते. या दिवशी एकूण 806 स्पर्धकानी सहभाग नोंदवला. त्यापैकी 603 स्पर्धकांचे उत्तर अचूक होते. यापैकी मीरा ज्ञानेश्वर कोकाटे व अन्वी आर. लाड यांना विजेते घोषित करण्यात आले. 

दि. ६ ऑगस्ट  व ७ ऑगस्टच्या स्पर्धेतील विजेते रामेश्वर दगडोबा वाघ, मीरा ज्ञानेश्वर कोकाटे, असलम खान मन्नान खान यांना जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते बक्षीस आणि प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी सुनिल पोटेकर, श्री.  भावसार उपस्थित होते.

दि.8 ऑगस्ट रोजी भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल कोण ? हा प्रश्न विचारण्यात आला होता. त्याचे अचूक उत्तर चक्रवर्ती राजगोपालाचारी हे होते. या दिवशी एकूण 530 स्पर्धकानी सहभाग नोंदवला. त्यापैकी 240 स्पर्धकांचे उत्तर अचूक होते. यापैकी मिनाक्षी नारायण माघाडे व ऋषिकेश रणजीत काकडे यांना विजेते घोषित करण्यात आले. 

दि.9 ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र लढ्यातील प्रथम महिला स्वातंत्र्य सेनानी कोण होत्या ? हा प्रश्न विचारण्यात आला होता. त्याचे अचूक उत्तर भिकाजी मादाम कामा हे होते. या दिवशी एकूण 403 स्पर्धकानी सहभाग नोंदवला. त्यापैकी 75 स्पर्धकांचे उत्तर अचूक होते. यापैकी अनिल कदम व आरती राऊत यांना विजेते घोषित करण्यात आले. फास्टेट फिंगर फर्स्ट विजेता म्हणून ऋतुजा वंशिता पुंड या ठरल्या.  

या स्पर्धेतील विजेत्यांचा दुसर्‍या दिवशी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या