💥'ती' च्या मुळे 'ति'ला कोणत्याही बंधनात राहावे लागणार नाही....!


💥मासिक पाळी व्यपस्थापन कार्यशाळेत किशोरवयीन मुलींचा सूर💥


आता सर्वच क्षेत्रात महिला अर्थात 'ती' आघाडीवर आहे म्हणून प्रत्येक महिन्याला 'ती' अर्थात मासिक पाळी आल्यावर 'ती' आता अंधश्रद्धेच्या कोणत्याच बंधनात राहणार नाही. उलट सॅनिटरी पॅड/कप सारखी शोषके वापरून आरोग्याची व स्वच्छतेची योग्य ती काळजी सोबत उत्तम पोषक आहार घेऊन ती शाळेत पण जाईल, आपल्या श्रद्धेनुसार मंदिरात पण जाईल, देवपूजा देखील करेल आणि सर्व प्रकारच्या विटाळ झुगारून मुक्तपणे आरोग्यदायी वातावरणात शिक्षण घेईल असा सूर सर्व विद्यार्थिनींमध्ये एचएआरसी संस्थे तर्फे आयोजित मासिक पाळी व्यवस्थापन कार्यशाळेत डॉ सौ आशा चांडक यांच्या मार्गदर्शन नंतर दिसून आला.


होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज परभणी या संस्थेतर्फे दि 23 ऑगस्ट मंगळवार रोजी जिल्हा परिषद प्रश्नाला झरी ,ता जि परभणी येथे मासिक पाळी व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात या शाळेतील इय्यता 8 वि ते 10वि तील जवळपास 128 किशोरवयीन मुलींची उपस्थिती होती.   

 या कार्यक्रमात डॉ सौ आशा चांडक (मासिक पाळी समुपदेशन तज्ञ) यांनी उपस्थित किशोरवयीन मुलींना ऋतुप्राप्ती झाल्यावर पौगंडावस्थेतील होणारे शारीरिक व मानसिक बदल, मासिक पाळी व्यवस्थापन, पाळी विषयीचे समज, गैरसमज, पाळीतील जननेंद्रियांची स्वच्छता, सॅनिटरी पॅड/सुती कापडाच्या घड्याचा  वापर, त्याची योग्य विल्हेवाट, सोबत मासिक पाळीशी संबंधित विविध आरोग्य समस्या, पीसीओएस, अतिरक्तस्राव तसेच पाळीमध्ये वापरण्यासाठी शाश्वत पर्याय अर्थात शोषक म्हणून मेन्स्ट्रुअल कप आदी विषयी मार्गदर्शन केले. 

या समुपदेशन सत्रात 128 विद्यार्थिनींना एचएआरसी संस्थे तर्फे समुपदेशन करून सॅनिटरी पॅड व मासिक पाळी व्यवस्थापन माहितीपत्रकाचे वाटप केले तसेच जिल्हा परिषद प्रश्नाला झरी ,ता जि परभणी येथील मुलींसाठी 'मेन्स्ट्रुपेडिया' या मासिक पाळी विषयक मराठी कॉमिक बुक चे इयत्ता नुसार वाटप करण्यात आले. "येत्या काळात शाश्वत पर्याय म्हणून एचएआरसी संस्थे तर्फे पॅड ऐवजी मेन्स्ट्रुअल कप वापरण्यासाठी इच्छुक गरजू किशोरवयीन मुलींना मोफत मेन्स्ट्रुअल कप चे मोफत वाटप करण्यात येणार असल्याचे " संस्थेचे अध्यक्ष डॉ पवन चांडक म्हणाले. 

मुलींनी परखडपणे व्यक्त केल्या भावना : अनेक विद्यार्थिनींनी स्टेजवर येऊन मनमोकळेपणे आपल्या मनातील प्रश्न, शंका  ना केवळ व्यक्त केल्या तर मासिक पाळी विषयीच्या विटाळ, चुकीच्या रूढी, गैरसमज विषयी परखडपणे भाष्य केले व विज्ञानवादी विचार व्यक्त केले। एचएआरसी टीमने त्यांच्या प्रश्नांचे शास्त्रोक्त उत्तराने समाधान केले.

प्रास्ताविक डॉ पवन चांडक यांनी केले.

या संपूर्ण उपक्रमाच्या यशस्वीतेतेसाठी एचएआरसी संस्थेचे अध्यक्ष डॉ पवन चांडक, डॉ सौ आशा चांडक, सौ शीतल राजुरे, मुख्याध्यापक प्रा दडके सर यांनी प्रयत्न केले। या प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षकवृंद, श्री अपसिंगेकर सर, श्री अमिलकंठवार यांची उपस्थिती होती.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या