💥परभणी तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीमध्ये एलईडी व्हॅनच्या माध्यमातून हरघर तिरंगा मोहिमे अंतर्गत जाणीव जागृती....!


💥हर घर तिरंगा मोहीम पंचायत समिती परभणीचा उपक्रम💥

परभणी (दि.06 आगस्ट) :- हर घर तिरंगा मोहिमेंतर्गत एलईडी व्हॅनच्या माध्यमातून परभणी तालुक्यातील विविध ग्रामपंचायती मध्ये हरघर तिरंगा मोहिमेअंतर्गत जाणीव जागृती करण्यात येणार आहे.

या एलईडी व्हॅनच्या माध्यमातून उद्घाटन गट विकास अधिकारी शिवाजीराव कांबळे यांच्या हस्ते परभणी पंचायत समिती परिसरामध्ये करण्यात आले.

यावेळी विस्तार अधिकारी  शैलेंद्र पानपाटील, विश्वनाथ पुरी, नरहरी वाघ यांच्यासह पंचायत समितीचे कर्मचारी ग्रामसेवक आणि ग्राम विकास अधिकारी यांची उपस्थिती होती.

****

💥बनवस येथे वृक्ष लागवड :-


पालम तालुक्यातील बनवसयेथे आझादीच्या अमृत महोत्सवानिमित्त वृक्ष लागवड व हर घर तिरंगा जनजागृती करण्यासाठी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची प्रभात फेरी गावामध्ये काढण्यात आली....

💥मानवत येथे  कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय तालुकास्तरीय रांगोळी स्पर्धेचे आयोजन :-


स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त आज कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय मानवत येथे तालुकास्तरीय रांगोळी स्पर्धेचे आयोजन तहसीलदार सारंग चव्हाण, गटविकास अधिकारी स्वप्नील पवार ,गटशिक्षणाधिकारी डी. आर.रणमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रप्रमुख शिरीष लोहटी करण्यात आले होते. याप्रसंगी  मुख्याध्यापक मैथिली जोशी, कुसुम कच्छवे, स्मिता पाटील, मंजूषा देशमुख, श्रीमती नाईक , उषा गवळे,सुचिता कार्ले, संजय पक्वाने पांढरी होगे, योगेश देशमुख, अमोल तापकिर, बाळू तुरे, ज्ञानेश्वर जलशिंगे, विवेक देवशटवार, सिंधाळकर, शिंदे  यांचे सहकार्य लाभले. शेवटी सर्वांचे आभार केंद्रप्रमुख शिरीष लोहट यांनी मानले व स्पर्धेचा समारोप केला.

-*-*-*-*-

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या