💥परभणीत क्रिडा दिना निमित्त मॅरेथॉन स्पर्धा संपन्न.....!


💥मॅरेथॉन स्पर्धाचे उद्घाटन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते संपन्न झाले💥

परभणी (दि.30 आगष्ट) : जिल्हा क्रीडा अधिकारी परभणी आणि परभणी जिल्हा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ, एकविध संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने 29 ऑगस्ट मेजर ध्यानचंद (हॉकीचे जादूगर) यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन यानिमित्त 29 ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय खुल्यागट (मुले/मुली) 5 कि.मी. धावने मॅरेथॉन स्पर्धाचे उद्घाटन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार, जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे अध्यक्ष रणजित काकडे, सचिव कैलास माने, बॉक्सींग मार्गदर्शक धनंजय बनसोडे, प्रा. डॉ. विनोद गणाचार्य यांची उपस्थिती होती.

येथील जिल्हा क्रीडा संकुलात सकाळी 7.00 वाजता मान्यवऱ्याच्या हस्ते हिरवी झेंडे दाखवून स्पर्धेला सुरुवात झाली 5 किमी च्या स्पर्धेत पुरुष व महिला गटात 150 खेळाडुनी सहभाग घेतला. या स्पर्धेत पुरुष गटात प्रथम पारितोषिक सचिन रोहिदास पवार यांनी स्मृतीचिन्ह आणि 1500 रुपये रोख प्राप्त केले. द्वितीय क्रमांकावर विनय बालासाहेब ढोबळे स्मृतीचिन्ह आणि 1000 रुपये रोख प्राप्त केले. तृतीय क्रमांकावर आकाश दत्ता कनकुटे स्मृतीचिन्ह आणि 700 रुपये रोख प्राप्त केले चतुर्थ क्रमांक वैभव बालाजी तरंगे स्मृतीचिन्ह आणि 500 रुपये रोख प्राप्त केले तसेच महिला गटात प्रथम अश्विनी मदन जाधव हिने प्रथम क्रमांक प्राप्त करुन स्मृतीचिन्ह आणि 1500 रुपये रोख प्राप्त केले द्वितीय क्रमांक वर्षा विष्णू कदम स्मृतीचिन्ह आणि 1000 रुपये रोख प्राप्त केले तृतीय क्रमांक निकीता विठ्ठल मात्रे स्मृतीचिन्ह आणि 700 रुपये रोख प्राप्त केले चतुर्थ परिमला बाबासाहेब बाबर स्मृतीचिन्ह आणि 500 रुपये रोख प्राप्त केले पाचवा क्रमांक साक्षी सुधाकर गायकवाड स्मृतीचिन्ह आणि 500 रुपये रोख प्राप्त केले.

या स्पर्धेसाठी पंच म्हणून प्रा. बालाजी वाघ, माणीक कदम, संभाजी शेवटे, कैलास टेहरे, यमनाजी भाळशंकर, अमोल नंद, गंगाधर आव्हाड, शिवाजी खुने यांनी काम पाहीले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. नानकसिंग बस्सी क्रीडा अधिकारी, यांच्या सह योगेश आदमे, धिरज नाईकवाडे, प्रकाश पंडित आदिनी प्रयत्न केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या