💥येलदरी धरणा शेजारी केबल स्टे पूल उभारणार :- आमदार मेघना साकोरे बोर्डीकर


💥येलदरी येथे वांद्रे - वरळीच्या धर्तीवर केबल स्टे पूलाचे बांधकाम करण्यात येणार💥 

६६ वर्षानंतर येलदरी धरणा शेजारी वांद्रे - वरळीच्या धर्तीवर मराठवाड्यात पहिला जर्मन तंत्रज्ञाना आधारे केबल स्टे पूल उभारणार असल्याचे जिंतूर विधानसभा मतदार संघाच्या लोकप्रिय आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांनी म्हटले आहे.


मराठवाडा आणि विदर्भाला जोडणाऱ्या येलदरी धरणा शेजारील फाळेगाव येलदरी जिंतूर रामा २४८  मार्गावरील येलदरी येथे वांद्रे - वरळीच्या धर्तीवर केबल स्टे पूलाचे बांधकाम करण्यात येणार आहे. भारतातील जम्मू काश्मीर वांद्रे - वरळी, भायखळा आणि आत्ता चौथ्या क्रमांका चा आणि मराठवाड्यातील हा पहिलाच पूल असणार आहे या पूलावर कायम स्वरूपी विद्यूतरोषणाई केली जाणार आहे पूलाच्या बांधकामासाठी  जर्मन तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे विशेष म्हणजे येलदरी धरण परिसरात पूलाच्या बांधकामा सोबतच पर्यटनाच्या दृष्टीने एकत्रित विकास आराखडा तयार केला गेला आहे.

या मार्गावर पाटबंधारे विभागा मार्फत केवळ धरणाची देखभाल करण्यासाठी दगडी पुलाचे बांधकाम करण्यात आले होते मात्र पुढे याच पुलावरून वाहतूकी साठी खुला करण्यात आला आहे मध्यंतरी सदर पूलावरून धरणात कोसळून ८ ते १० इसमांचा बळी गेला ४० ते ५० वेळा अपघात होऊन पूलावरून धरणात कोसळल्याने अनेक लोक जखमी झाले. 

      येलदरी धरण हे मराठवाड्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे धरण आहे हे धरण पर्यटनस्थळ म्हणून घोषित व्हावे यासाठी मागील अनेक वर्षापासून आमदार मेघना साकोरे बोर्डीकर राज्य सरकारकडे पाठपुरावा करत होत्या आणि  कालमर्यादा संपलेल्या दगडी पूलाकडे सरकारचे दुर्लक्ष का? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी  विधानसभेत चार वेळा प्रश्न उपस्थित केला. 

 माजी बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मेघना बोर्डीकर यांची तळमळ लक्षात घेता मार्च २०२० च्या अर्थसंकल्पीय अधिवेशना मध्ये पूलाच्या बांधकामासाठी ९५ कोटी रूपयांना मंजुरी दिली.

पूलाचा सविस्तर प्रकल्प विकास आराखडा (DPR) तयार करण्यासाठी मुंबई येथील नेरूळच्या सिव्हील ग्लोबल कंन्सल्टन्सी यांनी तयार केला 

सदर पुलाचा डीपीआर तयार करून सार्वजनिक बांधकाम विभाग, परभणी मार्फत निविदा प्रसिध्द करून  त्यात यशस्वी झालेल्या पुण्याच्या टी.एन.टी इन्फ्रा या कंपनीला  २० जुलै २०२२ रोजी या कामाचे कार्यारंभ आदेश देखील प्रदान करण्यात आले आहेत.सदर कामाची मुदत ही २४ महिन्यांची असून पुढील १० वर्ष या कंपनीकडे देखभाल दुरूस्तीची जबाबदारी राहणार आहे.

💥आमदारानी केला गाढा अभ्यास :- 

येलदरी धरणावर जम्मू-काश्मीरमधील उत्तर रेल्वेच्या (Railway) उधमपूर-श्रीनगर-बारामुलला रेल लिंक (यूएसबीआरएल) विभागावर अंजी खड येथे भारतीय रेल्वेने बांधत असलेल्या पहिल्या  केबल स्टे पूल ( cable stay railway bridge) कशा पध्दतीने बनवित आहे यासाठी भारत सरकार एंटरप्राइझ कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड कडून आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांनी माहिती मागवत त्याचा संपुर्ण अभ्यास केला त्यानंतर वांद्रे - वरळीतील केबल स्टे रेल्वे पूल ( cable stay railway bridge) पूलाची माहिती मागवली पाठोपाठ वांद्रे-वरळी सी लिंकच्या धर्तीवर मुंबईतील भायखळा येथे जुन्या आरओबीच्या बाजूला अत्याधुनिक डिझाइन केलेला केबल स्टे पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कळाल्यावर महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (महारेल) कडून देखील माहिती मागवली. व याच धर्तीवर येलदरी धरणात केबल स्टे पूल बांधण्याची सरकारकडे विनंती केली.

 अखेर येलदरी धरणावर वांद्रे-वरळी सी लिंकच्या धर्तीवर अत्याधुनिक डिझाइन केलेला केबल स्टे पूल बांधण्याचा निर्णय झाला येलदरी येथील पूलाच्या बांधकामा सोबतच पर्यटन वाढण्याच्या दृष्टिकोनातून एकत्रित विकास आराखडा तयार केला आहे. त्यामध्ये सर्वात आकर्षन म्हणजे केबल स्टे आधारित पूलासह उद्यान विकास, धरण परिसराचे सौंदर्यीकरण व  आणि सेल्फी पॉइंट तयार केला जाणार आहे.

 पूलाची रूंदी १८ .५० मीटर असून दोन्ही बाजूने अडीच मीटरचे फुटपाथ असून मधोमध ११ मीटरचा मजबूत काॅक्रीट रस्ता रहदारी साठी बांधण्यात येणार आहे. पूलाच्या एका बाजूला ७ आणि दुसऱ्या बाजूने ७ अशा १४ केबल स्टे ने पूल तरंगता ठेवण्यात येणार आहे. पूलाची एकुण लांबी २४० मीटर असून जिंतूरच्या दिशेने २१३ मीटर व सेनगावच्या दिशेने ५३४ मीटर असा एकून ९८७ मीटर लांबीत पूलाचे बांधकाम केले जाणार आहे.

      येलदरी परिसर पर्यटनाच्या दृष्टिने महत्वाचे आहे त्यादृष्टीनेच विकास केल्याजाईल.जिंतूर तालुक्यात एकूण २२ हजार हेक्टर वनक्षेत्र आहे त्यात १४७  विविध प्रजातीची प्राणी - पक्षी आहेत या वनक्षेत्रात १४ वर्षाच्या वनवास काळात रामाचे वास्तव्य असल्याचे पुरावे देखील आहेत पुरातन काळातील मुर्ती आहेत केंद्र सरकारच्या रामायण सर्किट योजनेत जिल्ह्याचा समावेश करण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील असा विश्वास आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांनी व्यक्त केला....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या