💥पुर्णा पंचायत समिती कार्यालया समोर सामाजिक हिताच्या मागण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे उपोषण सुरु....!


💥दरम्यान दुपारी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी उपोषणार्थिंची भेट घेऊन विचारपूस केली💥

महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा अमरावती जिल्ह्यातील अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार तथा गोरगरिबांच्या हितासाठी शासनदरबारी लढवय्या नेतृत्व असलेल्या बच्चू भाऊ कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या पूर्णा तालुका शाखा कार्यकर्त्यांनी सामाजिक हिताच्या मागण्यासाठी तारीख २३ ऑगस्ट २०२२ पासून पंचायत समिती कार्यालय पूर्णा समोर उपोषणाला सुरुवात केली आहे. यात, खुजडा येथील अंगणवाडी शाळेसमोरील रस्त्यावर सांडपाण्यामुळे होणारा त्रास दुर करणे, गावामधील मुख्य रस्त्यावरील सांडपाणी काढावे व रस्ता गावकरी मंडळींना रहादारीसाठी मोकळा करुन द्यावा, अंगणवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना येता जाताना साचलेल्या सांडपाण्यामुळे होणारा त्रास रोखावा, पूर्णा तालूक्यातील ग्रामपंचायती मार्फत अपंग बांधवांना दिला जाणारा ५ टक्के निधी वाटप करावा,तालूक्यातील  निराधार व विधवा महिलांना प्रधानमंत्री घरकुल योजनेचा विनाअट लाभ द्यावा या मागण्यासाठी उपोषण धरण्यात आले.. शिवलिंग भाऊ बोधने प्रहार जिल्हा प्रमुख परभणी. आहे.प्रहारचे उपजिल्हा प्रमुख नरेश जोगदंड, पूर्णा तालुका प्रमुख शिवहार सोनटक्के,उपतालूका प्रमुख बाभन ढोणे, गौर सर्कल प्रमुख गजानन कु-हे, चुडावा सर्कल प्रमुख श्रीहरी ईंगोले सह मंचक कु-हे, चंपत कदम, सुरेश वाघमारे, शिध्देश आगलावे, नितीन कदम, बाबुराव सोलव, हवसाजी तरासे, व्यंकटी डाखोरे, विष्णू चव्हाण, राजेंद्र डाखोरे, अप्पाराव तांबे, रामभाऊ सुके, मोतीराम भोसले, बालाजी मोहिते, विठ्ठल सवराते, फेरोज शेख, विठ्ठल बुचाले, सुनील भालेराव, बंटी सोनटक्के, सुभाष बेटकर, रामदास, शिवसांब कोटे, बळिराम गुंडाळे, संजय पिसाळ, संभाजी पांचाळ, तुकाराम वानखेडे आदींनी उपोषण चालू केले आहे. यामुळे पंचायत समिती अधिकारी व खुजडा ग्रामपंचायत पदाधिका-यास गावक-यात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, दुपारी प्रहारचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी उपोषणार्थिंची भेट घेऊन विचारपूस केली.सदरील उपोषण तालुका प्रमुख शिवहार सोनटक्के यांच्या नेतृत्वाखाली चालू असून मागण्या मार्गी लागे पर्यंत हा लढा सुरु राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या