💥पुर्णा तालुक्यात सरासरी ३७३ मिलीमिटर पावसाची नोंद : शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान....!


💥तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी टेमकर यांच्या आदेशानंतर ही तालुका कृषी अधिकाऱ्यांची पंचनामे करण्यास टाळाटाळ💥 

परभणी/पुर्णा (दि.१४ आगस्ट) - परभणी जिल्ह्यासह पुर्णा तालुक्यातील सर्वसामान्य नागरीक शेतकऱ्यांना कोणी वाली आहे का नाही असा प्रश्न सातत्याने उपस्थित होत असून प्रशासनाचा हलगर्जीपणा लोकप्रतिनिधींचे संधीसाधू धोरण यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा आत्महत्येचा मार्ग पत्करण्याची परिस्थिती निर्माण झाल्याचे निदर्शनास येत आहे मागील पाच सहा वर्षापासून सातत्याने कोरडा/ओला दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या  तालुक्यातील अन्नदात्या शेतकरी वर्गावर सातत्याने निसर्गाची अवकृपा होत असून शेतकऱ्यांनी पिकांचा पिक विमा भरल्यानंतर देखील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या विक विम्याची रक्कम देण्यास देखील पिक विमा कंपन्या जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत असतांना दिसत असून मागील २०२०/२१ या वर्षातील पिक विम्याच्या रक्कमेपासून तालुक्याती अंदाजे ६०/६५ टक्के शेतकऱ्यांना अद्यापर्यंत रिलायंन्स कंपनीकडून पिक विम्याची रक्कम मिळालेली नाही ३५ टक्के शेतकऱ्यांनी अॉनलाईन पिकांचे परिस्थितीचे पंचनामे कंपनीकडे पाठवले त्यांना प्रतिहेक्टरी १६ हजार रुपयां प्रमाणे कंपनीकडून विमा रक्कम प्राप्त झाली पंरतु उर्वरीत शेतकऱ्यांना ज्यांनी अॉफलाईन अर्जासह पिकांच्या परिस्थितीचे पंचनामे फोटोसह सबमीट केले त्यांना मात्र अद्यापर्यंत पिक विमा रक्कम मिळाली नाही अश्या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या हक्कासाठी ना प्रशासन ना लोकप्रतिनिधी कोणीही आवाज उठवण्यास तयार नाही कारण संबंधित कंपनीने सर्वांचीच तोड गांधी छाप चिकटपट्टीने बंद केल्याचे दिसत आहे.


मागील पाच सहा वर्षाप्रमाणे याही तालुक्यातील शेतकऱ्यांची दैनाच होते की काय ? असा गंभीर प्रश्न निर्माण होत असून याही वर्षी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांच्या खरीफ हंगामातील उभ्या पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे निदर्शनास येत असून तालुक्यात आतापर्यंत ३७३ मिलीमिटर पाण्याची नोंद झाली असून शेतकऱ्यांच्या शेतांतील उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी वर्ग अक्षरशः हातघाईला आला असतांना शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचणामे करण्यात यावे असे आदेश पुर्णेच्या तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी पल्लवी टेमकर यांनी पुर्णा तालुका कृषी अधिकारी तांबीले यांना दिल्यानंतर देखील कृषी अधिकारी तांबीले पंचणामे करण्यास टाळाटाळ करीत असल्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या शिस्टमंडळाने काल शनिवार दि.१३ आगस्ट २०२२ रोजी कृषी अधिकारी यांना चांगलेच धारेवर धरले पिक पंचणामे करण्यास का टाळाटाळ करण्यात येत आहे ? असा प्रश्न संभाजी ब्रिगेड कडून उपस्थित केल्यानंतर तालुका कृषी अधिकारी यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने संभाजी ब्रिगेडच्या शिस्टमंडळाने संताप व्यक्त केला आहे.....     

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या