💥येथे भरतो मजुरांचा बाजार आणि होतो कष्टांचा लिलाव ? महागाईने मजूर त्रस्त....!


💥सध्या महागाईच्या तुलनेत कमी दर मिळत असल्याने मजुरांना उदरनिर्वाह करणे कठीण💥 

जिंतूर प्रतिनिधी /  बी.डी. रामपूरकर 

जिंतूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात मजूर कामांच्या प्रतीक्षेत उभे असतात ज्या कोणाला तात्पुरत्या कामाची गरज असते ते शिवाजी चौक या ठिकाणी येऊन मजुरी काम करणाऱ्या कामगार सोबत बोली करून कामाचा मोबदला ठरवतात. परंतु मजुरी कामगारांना महागाईमुळे पाहिजे तशी मजुरी मिळत नाही. त्यामुळेच येथे भरतो मजुरांचा बाजार अन होतो कष्टांचा लीलाव असे म्हणणे वावगे ठरणार नाही.


सध्या महागाईच्या तुलनेत कमी दर मिळत असल्याने मजुरांना उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. पर्याय नसल्याने मजुरांना मिळेल त्या मजुरीत काम करावे लागत असल्याचे भयान चित्र समोर दिसत आहे.मागील दोन वर्षांच्या करुणाकाळात सर्व व्यवहार बंद होती. त्यावेळी मागील दोन वर्षात बांधकाम मजुरांची मोठी परवड झाली होती अनेकांच्या हाताला काम नव्हती आता कामे सुरू झाली असली तरी नियमित कामे मिळत नसल्याने कुटुंबासाठी चालवने अडचणीचे झाले आहे.

*सध्या काय आहेत मजुरीचे दर*

मिस्तरी मजुरी------- ७००

मिस्त्री च्या हाताखाली मजूर----४५०

सिमेंट रेती मटेरियल कालवणे--४५०

नियमित काम-----------------४००

*सकाळी आठ ते अकरा छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात गर्दी :-

शहरातील शिवाजी चौक परिसरात सकाळी आठ ते अकरा या वेळेत मजूर उपलब्ध असतात यावेळी ज्यांना मजुरांची गरज आहे ते येतात बोलणी करून मजुरी ठरवतात 8 ते 11 या वेळेत येथे गर्दी पहावयास मिळते.

* या ठिकाणी मजुरांच्या मेहनतीचा लिलाव ?

छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात मजूर कामांच्या प्रतीक्षेत उभे राहतात. तिथे त्यांच्या मेहनतीची बोली होते तर काहींना काम न मिळाल्याने माघारी जावे लागते.याबाबत सदरील ठिकाणी अनेक कामगारांनी त्यांच्या प्रतिक्रिया नोंदवल्या.पाणी पावसाने कामे लागत नाही महागाईने गॅस, तेल, दाळी, भाव गगनाला गेली ४०० ते४५०  रुपये मजुरीत भागत नाही.

कामगारांच्या प्रतिक्रिया :- 

*गजानन कुटे -

सर्व वस्तू चे महागाईने भाव वाढ झाल्याने आलेली मजुरी पुरत नाही जे मिळेल त्यातच कुटुंबांचा खर्च धकवावे लागते. दररोज नियमित कामे मिळत नाही.....

*सय्यद अमजद -

बाहेर गावाहून मजुरीसाठी यावे लागते. कधी कधी कामे  लागतात वझर ते जिंतूर येणे जाणे शंभर रुपये खर्च येतो.

*पुंजाराम मोरे -

बाहेर गावाहून येतो नियमित कामे मिळत नाहीत. तीनशे रुपये मजुरीत पडत नाही.

 *शेषराव राठोड -

अनेक मजुरांनी बोलक्या प्रतिक्रिया दिल्या त्यातच काहींनी आम्ही खरे मजूर असून आम्हास मजूर कार्ड मिळत नाही परंतु इतर दुकानावरील कामगारांना व दुकानदारांना मजूर कार्ड उपलब्ध होते. हे आमच्यावर अन्याय आहे अशी प्रतिक्रिया बोलून दाखवली....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या