💥क्रांती दिनानिमित्त राष्ट्रगीत व जयघोषाने दणाणले क्रीडा संकुल ; विद्यार्थी व नागरिकांचा उस्फुर्त सहभाग....!


💥नागरीकांनी मानवी साखळी तयार करीत, क्रांतीविरांचा जयघोषासह सामुहिक राष्ट्रगीताद्वारे स्टेडीअम मैदान दणाणून सोडले💥


परभणी (दि.०९ आगस्ट) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर  जिल्हा प्रशासनाने क्रांती दिनानिमित्त येथील क्रीडा संकुलात आयोजित केलेल्या सामुहिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह मोठया संख्येने नागरीकांनी मानवी साखळी तयार करीत, क्रांतीविरांचा जयघोष करीत व सामुहिक राष्ट्रगीताद्वारे स्टेडीअम मैदान दणाणून सोडले.


           ‘चले जाव’ चळवळीच्या स्मृतींना जागवण्यासाठी व देशभक्तीचे स्फुल्लिंग नव्याने तेवत ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात होते. सकाळपासून विविध शैक्षणिक संस्थांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. यापैकी बहुतांशी शैक्षणिक संस्थांच्या विद्यार्थ्यांनी शाळांपासून स्टेडीअम मैदानापर्यंत ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ असा जयघोष करीत प्रभातफेरी काढली. 8वी ते 10 वी चे  विद्यार्थी प्रभातफेरीने क्रिडा संकुलात दाखल झाल्यानंतर या संकुलातील वातावरणच पूर्णतः बदलून गेले. देशभक्तीपर गीते, भारत मातेचा जयघोष अन तालासूरातील बॅन्ड पथक वगैरे गोष्टी तसेच क्रांतीकारक, स्वातंत्र्य सेनानी, भारत माता वगैरेंच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी या वातावरणात सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. यावेळी विविध जयघोषानी विद्यार्थ्यांनी घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता. विद्यार्थ्यांच्या सहभागातून यावेळी मानवी साखळी तयार करण्यात आली.

           यावेळी बाल विद्या मंदिरच्या विद्यार्थीनींनी तिरंगा गीताचे सादरीकरण केले. तर  क्रांती दिनाच्या विविध प्रसंगाचे नाट्यकरण स्वरूपात  1857 ते 1942 पर्यंतचा देशाचा स्वातंत्र्य संग्राम सादर केला. सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयाच्या विद्यार्थींनी भारत देशाचा नकाशा निर्माण करून गीताचे सादरीकरण केले.

           एनव्हीएस मराठवाडा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य सेनानींसह क्रांतीविरांची वेशभूषा साकारून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सारंग स्वामी विद्यालय, समर्थ विद्या मंदिर व अन्य विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी हातात तिरंगी झेंडे घेऊन, स्वातंत्र्याचा जयघोष करीत क्रांती दिनाची खर्‍या अर्थाने जणू आठवण करून दिली.

          यावेळी जिल्हाधिकारी आंचल गोयल, जीपचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, मनपा आयुक्त देविदास पवार, जिल्हा प्रकल्प अधिकारी रश्मी खांडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपमुख्यकार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, संदिप घोन्सीकर, शिक्षणाधिकारी (मा.) आशा गरूड, जिल्हा क्रिडा अधिकारी नरेंद्र पवार आदींची उपस्थिती होती.

           कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपशिक्षणाधिकारी गणराज यरमळ, गटशिक्षणाधिकारी मंगेश नरवाडे, विस्तार अधिकारी गोविंद मोरे, मधुकर उमरीकर, बजरंग ठाकूर, भारत शहाणे, क्रिडा शिक्षक कैलास माने, सुशिल देशमुख, रणजित काकडे, कैलास टेहरे, नवनीत देशमुख, सर्व शाळांचे  मुख्याध्यापक, गटसाधन केंद्र परभणी चे केंद्रप्रमुख, विषय तज्ञ यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्र संचलन प्रविण वायकोस, प्रेमेंद्र भावसार, प्रसन्न भावसार, सुनिल मोडक यांनी केले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या