💥पुर्णा तालुक्यातील माटेगाव येथे आरसेटी तर्फे शेळीपालन प्रशिक्षण शिबीर संपन्न....!


💥महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे या दृष्टीकोनातून शेळी पालन व्यवस्थापसह विक्री प्रकल्प अहवाल विषयावर मार्गदर्शन💥

पूर्णा (दि.०३ आगस्ट) - तालुक्यातील माटेगाव येथील ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था परभणी ʀꜱᴇᴛɪ च्या वतीने ग्रामीण भागातील महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हाव्यात यासाठी दि. २१ ते ३० च्या दरम्यान महिला बचत गटातील सदस्यासाठी मोफत १०दिवसीय  भोजना सहित प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेचा कणा पशुपालन आहे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील  या दृष्टीकोनातून या शिबिरामध्ये शेळी पालन व्यवस्थापन बाजार विक्री प्रकल्प अहवाल आदी विषयावर मार्गदर्शन करण्यात आली दि ३० रोजी परभणी येथे प्रशिक्षणार्थी महिलांची लेखी व तोंडी परीक्षा घेऊन प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले यावेळी निरोप समारंभातील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  डेप्युटी सीईओ विशाल जाधव एलडीएम सुनील हट्टेकर आरसेटी  संचालक कुशावह यांची उपस्थिती होती यावेळी प्रशिक्षणार्थी महिला संगीता बोबडे आसमा शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या  मार्गदर्शिका  सौ मनीषा कदम यांच्या नियोजनाखाली शिबीर संपन्न झाले शिबिरात४५ महिलांनी सहभाग नोंदवला

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या