💥परभणीत 'आझादी का अमृत महोत्सव निमित्त' कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र वनामकृवि तर्फे १ दिवसीय महिला कार्यशाळा संपन्न...!


💥या कार्यक्रमास प्रमुख वक्त्या म्हणून डॉ.मधुमती कुलकर्णी यांची प्रामुख्याने उपस्थिती💥

परभणी (दि.१३ आगस्ट) - दिनांक ११ ते १७ ऑगस्ट २०२२ या कालावधीमध्ये राज्यात "आझादी अमृत महोत्सव" अंतर्गत विविध उपक्रम राबविण्याच्या अनुषंगाने दि.१२.०८.२०२२  रोजी विस्‍तार शिक्षण संचालनालय अंतर्गत कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र वनामकृवि, परभणी येथे 'एक दिवसीय महिला कार्यशाळेचे' आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.गजानन गडदे, विस्तार कृषी विद्यावेत्ता तथा व्यवस्थापक कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, वनामकृवि, परभणी हे होते. प्रमुख वक्त्या म्हणून डॉ.मधुमती कुलकर्णी ह्या लाभल्या तर  प्रमुख उपस्थिती कृषी विभाग आत्मा च्या श्रीमती स्वाती घोडके यांची होती.


या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या डॉ.मधुमती कुलकर्णी यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतीय संस्कृती जपण्यात महिलांची भूमिका, भारत देश जगातील महासत्ता करायची असेल तर प्रत्येक क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढविणे गरजेचे आहे तसेच महिला सक्षमीकरण या विषयावर मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोपात डॉ.गडदे यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये फक्त पुरुषांचाच वाटा नसून महिलांचा सुद्धा तेवढाच वाटा आहे तसेच वेळ प्रसंगी महिलांनी सुद्धा बलिदान दिल्याचे त्यांच्या नावासहित नमूद केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन श्री.मधुकर मांडगे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी ज्ञानोबा माहोरे दिगंबर रेंगे, नितीन मोहिते, शेख साजेद, श्री.डिकळे आणि शेख सुलताना यांनी परिश्रम घेतले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या