💥जिंतूर तालुक्यातील कौसडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात महिलांची आरोग्य तपासणी शिबिर......!


💥या आरोग्य तपासणी शिबीरात 175 महिलांची तपासणी करण्यात आली💥

जिंतूर प्रतिनिधी  / बी.डी.रामपूरकर 

जिंतूर (दि.१३ आगस्ट) - तालुक्यातील कौसडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दिनांक 12 ऑगस्ट रोजी महिला आर्थिक विकास महामंडळ परभणी अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र कौसडी व एकता लोकसंचालित साधन केंद्र जिंतूर यांच्या संयुक्त विद्यमाने 75 व्या स्वतंत्र अमृत महोत्सवानिमित्त महिलांची तपासणी व आरोग्य शिबिर घेण्यात आले. यामध्ये 175 महिलांची तपासणी करण्यात आली. पूर्ण देशभरात भारतीय स्वतंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त स्वतंत्राचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. 

या मध्ये शासकीय ,निमशासकीय संघटना विविध उपक्रम राबवित आहे. याचाच एक भाग म्हणून कौसडी येथे आरोग्य शिबिर राबविण्यात आले. या शिबिरामध्ये सी बी सी, टी एफ टी, एच बी एस ए जी, बी एस एल, एच आय व्ही, बी पी, शुगर इत्यादी तपासण्या करण्यात आले. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जाधव  महिला आर्थिक विकास महामंडळ चे जिल्हा लिपिक अधिकारी किरण तांदळे ग्राम संघ अध्यक्ष सौ.जयश्री मोरे  उपजीविका समन्वयक मंदा वाकळे, शारदा वजीर, सुमनबाई गायकवाड, दुर्गा खैरे, सुलोचना जैस्वाल, सुरैया शेख, सविता जिवने, सुनिता काळे, कल्पना घनमोडे सी एच ओ गजानन नव्हाट, मनोज सोनटक्के, वेणू दिपके, राजश्री शिरसे एम पी डब्ल्यू उमाकांत खंदारे, अशोक वरकटे, जनार्दन कुंटे, विजय मोरे एच. ए . गिराम, जी एन एम किरण शेंडे, ए एन एम पार्वती गायकवाड, मंजुषा शहाणे, पिटीएल ए लांभाडे लॅब टेक्निशन उत्तम साळवे, अरुण पंचांगे, प्रदीप मते, सुरेश नवटक्के यांच्यासह महिला बचत गट आशा वर्कर उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या