💥जिंतूर मध्ये राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन....!


💥सदरील लोकन्यायालयात तडजोडीअंती अधिकाधिक प्रकरणे निकाली काढण्यात येणार आहेत💥

जिंतूर प्रतिनिधी  / बी.डी. रामपूरकर

जिंतूर (दि.०७ आगस्ट) - तालुका विधी सेवा समिती व  वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने जिंतूर येथील न्यायालय परिसरात राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे सदरील लोकन्यायाल 13 ऑगस्ट 2022 शनिवार सकाळी 10: 30 वाजता आयोजन करण्यात आले आहे

या लोकन्यायालयात सर्व प्रकारची तडजोड पत्रे, फौजदारी प्रकरणे, भारतीय चलन, चलनक्षम दस्तावेज अधिनियम, वीज चोरी प्रकरणे, पाणी आकार प्रकरणे, घरपट्टी, बँकांची वसुली वाद पूर्वप्रकरणी आदी प्रकारची दिवाणी प्रकरणे ठेवण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

सदरील लोकन्यायालयात तडजोडीअंती अधिकाधिक प्रकरणे निकाली काढण्यात येणार आहेत. या राष्ट्रीय लोक न्यायालयात जास्तीत जास्त पक्षकारांनी उपस्थित रहावे असे आव्हान दिवानी न्यायाधीश तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष एम.आर. पनाड ,वकील संघाचे अध्यक्ष अॅड. व्ही.ए. सोनवणे, उपाध्यक्ष अॅड.एमडी जोशी ,सचिव अॅड. एम. व्ही. दाभाडे  यांनी केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या