💥भंडारा जिल्ह्यातील बलात्कार प्रकरणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारला धरले धारेवर....!


💥महिला सुरक्षेसह कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते दानवे यांनी आक्रमकरित्या सभागृहात  मांडला💥

✍️ मोहन चौकेकर 

मुंबई : भंडारा जिल्ह्यातील बलात्कार प्रकरणात झालेल्या हलगर्जीपणाबाबत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज विधानपरिषद सभागृहात अल्पकालीन चर्चेद्वारे सरकारला धारेवर धरले.

 राज्यातील विविध ठिकाणी महिला अत्याचारा सारख्या गंभीर घटना समोर आल्या आहेत, त्यामुळे महिलांच्या सुरक्षेबाबत कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते अंबादास  दानवे यांनी आक्रमकरित्या सभागृहात  मांडला. 

संबंधित पीडित मुलीला पोलीस पाटील महिलेने पोलीस ठाण्यात नेल्यावर तिथून ती मुलगी भूक लागली म्हणून बाहेर पडली असता पुन्हा तिच्यावर दोन जणांनी जेवण देतो असे सांगून अत्याचार केले. एक पीडित तरुणी भूक लागली म्हणून बाहेर पडते त्यावेळी पोलीस यंत्रणा काय करत होती असा जाब दानवे यांनी सरकार विचारला. तसेच या घटनेदरम्यान तेथील पोलीस अधीक्षक हे पद रिक्त होते, त्यामुळे तपासाला विलंब लागल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.

तसेच वैजापूर येथे एका मंत्र्यांच्या कार्यक्रमाला गेल्याच्या कारणावरून आमदाराकडून बेदम मारहाण केल्याचा आरोप एका महिलेने केला त्याबाबत सरकार काय भूमिका घेणार असा सवाल विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विचारला असता, त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, या घटनेची सरकारकडून चौकशी करण्यात येईल.

भंडारा जिल्ह्यातील बलात्कार प्रकरणात कोणतीही हयगय केली जाणार नाही.आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल. तसेच शक्ती कायद्यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयाने काही माहिती मागितली असून त्याबाबत आठ विभाग  अभ्यास करत आहेत. पोलीस विभाग ती देईल आणि गरज पडली तर मी स्वतः दिल्लीला जाईल असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले..... 

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या