💥परभणीत शिवसेना खा.संजय जाधव आयोजित ‘राजे संभाजी मित्र मंडळाच्या दहीहंडी महोत्सवात नांदेड संघ आला प्रथम....!

 


💥तरूणाई थिरकली 'गोविंदा'चा गगनभेदी जयघोष ; तूफान नृत्यप्राजक्ता माळीची उपस्थिती लक्षवेधी : अनेक संघ सहभागी💥 

परभणी (दि.22 आगस्ट) : परभणी लोकसभा मतदार संघाचे शिवसेना खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांच्या कडून प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी दि.२१ आगस्ट २०२२ रोजी जिंतूर रस्त्यावरील महात्मा फुले शाळेच्या भव्य प्रांगणात त्यांनी स्थापण केलेल्या राजे संभाजी मित्र मंडळाच्या वतीने दहीहंडी महोत्सवा अंतर्गत ‘माखन चोर दहीहंडी' स्पर्धेत नांदेड येथील "जय बंजरंग'संघाने प्रथम, तर "राजे संभाजी' व "संत जनाई' या गंगाखेड येथील दोन संघानी अनूक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला.

 रविवारी रात्री " गोविंदा आला रे आला'च्या जयघोषात, डीजेवरील गिताच्या तालावर बेफान नृत्य करीत हजारो तरुणाईने महात्मा फुले विद्यालयाचे मैदान अक्षरशः दणाणून सोडले. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या स्पर्धेत अनेक संघांनी भाग घेतला होता राजे संभाजी मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली राजे संभाजी मित्र मंडळाच्या वतीने मागील 20 वर्षापासून ‘माखन चोर दहीहडी स्पर्धा’ होत आहेत. या स्पर्धेत परभणी जिल्हासह राज्यभरातून नामांकित गोविंद पथके दरवर्षी दाखल होतात. मागील दोन वर्ष कोरोनाचे सावट असल्याने मंडळाने स्पर्धा रद्द केल्या. मात्र, यावर्षी याचे स्वरुप भव्यदिव्य असेच होते.

या स्पर्धेच्या निमित्ताने शहरासह जिल्ह्यातील, मराठवाडयासह बाहेरील जिल्ह्यातील मातब्बर संघ रविवारी रात्री या मैदानावर दाखल झाले,तेव्हा "गोविंदा आला रे आला' असा गजर करीत हजारो तरुणांनी या संघाचे जल्लोषात स्वागत केले. डीजेवरील गाण्याच्या तालावर तूफान नृत्य,टाळ्यांच्या गजर करीत तरुणाईने हे मैदान अक्षरशः डोक्यावर घेतले,यावेळी प्रत्येक संघाने पहिल्या टप्प्यात एका सरस एक मनोरे उभे केले.क्षणार्धात उभे केलेल्या या मनोरे यामुळे संपूर्ण वातावरण चैतन्यमय  झाले."गोविंदा' असा जयघोष करीत तरुणाईने पुन्हा हे मैदान अक्षरशःदणाणून सोडले रात्री उशिरापर्यंत हा जल्लोष  सुरू होता.

            या वर्षीच्या स्पर्धेमध्ये विजेत्या संघाला मंडळाद्वारे प्रथम पारितोषिक 1 लाख 1 हजार, द्वितीय पारितोषिक 71 हजार, तृतीय पारितोषिक 51 हजार प्रदान करण्यात आले.यावर्षी दहीहंडी स्पर्धेसाठी मराठीतील सिनेतारका प्राजक्ता माळी आणि अभिनेत्री नृत्यांगणा सुकन्या काळण यांची विशेष उपस्थिती लक्षवेधी ठरली.या दोन्हीनी व्यासपीठावर इंट्री करतात या तरुणांचा जल्लोष झाला टाळ्यांच्या गजरात तरुणाईने या दोघा अभिनेत्रींचे अभूतपूर्व असे स्वागत केले यावेळी नृत्यांगना सुकन्या काळाण यांनी सुंदर अशी नृत्य सादर केली, त्यामुळे संपूर्ण वातावरणच जल्लोष वय झाले होते.स्पर्धेसाठी डान्स डान्स कार्यक्रमात असणारी प्रसिद्ध ऑर्केस्ट्रा टीम देखील बोलवण्यात आली होती दरम्यान, महात्मा फुले विद्यालयाच्या मैदानावर भव्य एलईडी लाईट व्यवस्था व साऊंड सिस्टिम लावण्यात आली होती. महिलांसाठी स्वतंत्र शासन व्यवस्था करण्यात आली. 

शिवसेनेचे खासदार संजय जाधव,आमदार डॉक्टर राहुल पाटील, जिल्हाप्रमुख विशाल कदम, माजी मनपा सदस्य तथा जिल्हा बँकेचे संचालक अतुल सरोदे, गंगाप्रसाद आनेराव, उपजिल्हाप्रमुख प्रा, डॉ, पंढरीनाथ धोंडगे, युवा सेना जिल्हाप्रमुख अर्जुन सामाले, प्रविण गोमचाळे, संजय सारणीकर, प्रदीप भालेराव, शुभम पाष्टे, विकी पाष्टे, विठ्ठल शिंदे, बाळासाहेब जाधव, मारोती इक्कर, सुभाष टाक, झैलसिंग बावरी, निलेश जगताप, विकास जैस्वाल, बंडूअण्णा जाधव, उदय गिरी, विनायक बनसोडे, पंकज झरकर, यश चांदेकर, सचिन मोटे, अभिजीत मुंडे, संतोष कांबळे, अमोल जाधव, गोपाळ उदावंत, गोविंद माने, अशोक कांबळे, सौरभ पाष्टे, राजू मस्के, संदीप देशमुख आदींनी स्पर्धेच्या यशस्वी करीता प्रयत्न केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या