💥परभणी जिल्ह्यातल्या पालम तालुक्यातील फरकंड्यातील दिग्रस उच्च पातळी बंधाऱ्यात अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी बुडीत क्षेत्रात....!💥बंधाराग्रस्त शेतकरी अद्यापही मोबदल्यापासून वंचित : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे लक्ष देतील काय ?💥 

परभणी : परभणी जिल्ह्यातल्या पालम तालुक्यातील दिग्रस बंधारा पाणलोट क्षेत्रात परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात शेत जमिनी गेल्या परंतु त्या शेतकऱ्यांचे दुर्दैव त्यांना पानलोट क्षेत्रात गेलेल्या जमिनीच्या बदल्यात त्यांच्या हक्काचा मावेजा अजून देखील मिळालेला नाही यास सर्वस्वी प्रशासनाची अकार्यक्षमता जवाबदार असून असंख्य शेतकरी शेतजमिनींचा मावेजा मिळावा याची प्रतिक्षा करीत आहे. डिग्रस बंधारा परिसरातील शेतकऱ्यांचे दुर्दैवच म्हणावे लागेल की त्या शेतकऱ्यांना प्रशासन अजून ही वाढीव रक्कम अदा करीत नसल्याने पालम तालुक्यातील फरकंडा येथील बंधाराग्रस्त शेतकरी अक्षरशः त्रस्त झाले आहेत.

तालुक्यातील फरकंडा येथील मावेज्यापासून वंचित राहिलेल्या उर्वरित शेतकऱ्यांना त्यांच्या संपूर्ण जमिनीचा अद्याप ही मावेजा मिळाला नाही मागील दोन ते तीन वर्षापासून पाणलोट क्षेत्रातील शेतकरी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करत असून त्यांच्याकडून  मार्गदर्शन वर मार्गदर्शन मागवण्यात येत आहे. त्यामुळे हा प्रश्न कधी निकाली लागेल या कडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहे. त्या मूळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असून लोक कल्याणकारी प्रशासनाला खेटे मारून शेतकरी हैराण झाले आहेत. तर बुडीत क्षेत्रात जमीन लावून ही मोबदला साठी वारंवार खेटे मारावे लागतात याकडे वरिष्ठ अधिकारी लक्ष देतील का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.  

राज्य शासनाने जमीनभूसंपादन करून तात्काळ मोबदला वाटप करावा अश्या मागणीचे अनेक वेळा निवेदने देण्यात आली आहेत. परंतु निद्रीस्त प्रशासन गंभीर पणाने दखल घेत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरत आहे.शासनाच्या वेळकाढू धोरणामूळे मूळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्यमय भावना निर्माण झाली आहे. आपल्या वडिलोपार्जित जमिनीचा योग्य तो आर्थिक  मोबदला मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी अनेक वेळा उपोषणे करून शासन दरबारी मागणी करण्यात येत आहेत.

परंतु दिनांक २७ डिसेंबर २०२१ रोजी मुख्य अभियंता (जस) जलसंपदा विभाग औरंगाबाद यांना कळवले अधीक्षक अभियंता मंडळ कार्यालया ने धोरणात्मक निर्णय संदर्भात मार्ग दर्शन वरिष्ठ कार्यालयाकडे मागितलेले आहे. पण ते अद्यापही अप्राप्त आहे प्राप्त होताच पुढील कारवाई करू पण कधी प्राप्त होईल आणि कधी कारवाई होईल याकडे बंधाराग्रस्त शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ मोबदला वाटप करण्यात यावा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी तात्काळ या प्रकरणी स्वतः दखल घेऊन हा शेतकरी हिताचा महत्वाचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी  शेतकऱ्यातून होत आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या