💥पुर्णा तालुक्यातील चुडावा पोलिस स्थानकाच्या हद्दीत चोरट्यांचा धुमाकूळ : पोलिस प्रशासन निद्रिस्त....!


💥परिसरातील शेतकऱ्यांच्या आखाड्यावरील जनावरांसह,शेती उपयोगी साहित्य विहिरीवरील मोटारींसह धान्याची देखील चोरी💥

पुर्णा (दि.२३ आगस्ट) - तालुक्यातील पुर्णा-नांदेड राज्य महामार्गावरी चुडावा पोलिस स्थानकाच्या हद्दीतील गौर गावासह आसपासच्या गावांमध्ये चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातल्याचे निदर्शनास येत असून या परिसरात चोरट्यांच्या टोळ्या फिरून शेतकऱ्यांच्या शेताच्या आखाड्यावरील शेती उपयोगी साहीत्य तसेच विद्युत मोटारी,ट्रॅक्टर्स/दुचाकी वाहणांच्या बॅटऱ्या,हल्लरच्या मोटारी तसेच शेतातील आखाड्यावरील शेळ्या,गाई,बैल आदींसह शेतकऱ्यांच्या शेतातील ज्वारी गहू हरबरा चोरटे पळवीत असल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून अश्या प्रकारे गाव शेत शिवारातील सर्वसामान्य शेतकरी वर्ग चोरट्यांना त्रस्त झाला असतांना चुडावा पोलिस स्थानकातील अधिकारी कर्मचारी मात्र निद्रिस्त असल्याचे निदर्शनास शेत असून दि.२०/२१ आगस्ट २०२२ च्या मध्यरात्री पुर्णा-नांदेड राज्य महामार्गावरील गौर फाटा येथील शेतकरी सचिन सदाशिव जोगदंड राहते घर/आखाड्यावरील तब्बल २० हजार रुपयांच्या शेळी (बकरी) चोरट्यांनी पळवून नेली यापुर्वी देखील त्यांच्या आखाड्यावरून चोरट्यांनी एक कट्टा हरबरा व एक कट्टा ज्वारी प्रतिकट्टा ५० किलो चोरट्यांनी पळवल्याची घटना घडली होती.


पुर्णा-नांदेड राज्य महामार्गारील गौरसह आसपासच्या गावांमध्ये चोरटे अक्षरशः धुमाकूळ घालत असून अश्याच प्रकारे दि.१९ आगस्ट २०२२ रोजी रात्री ०८-०० ते ०८-१५ वाजेच्या दरम्यान पुर्णा-नांदेड राज्य मार्गावरील रॉयल धाब्या लगत भररस्त्यात मोटारसायकलस्वार वैभव नवनाथ पारवे यांना अडवून त्यांच्याकडील खिशातील ३ हजार ५०० रुपयांसह त्यांच्याकडील रिअल मी सि.-३५ हा १२ हजार रुपये किंमतीचा नवाकोरा मोबाईल फोन हिसकावून घेत त्याला मोटारसायकलवर आलेल्या चोरट्यांनी लोखंडी रॉडने गंभीर स्वरूपाची मारहाण केल्याची घटना घडली या संदर्भात चुडावा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अश्या प्रकारे चुडावा पोलिस स्थानकाच्या हळुवारपणे चोरट्यांनी डोके वर काढल्याचे निदर्शनास येत असून आता या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन धारकांना देखील भररस्त्यात अडवून लुटण्याचे प्रकार होतांना दिसू लागले आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या