💥पुर्णा तालुक्यातील धानोरा काळे येथील जिल्हा परिषद शाळा अंतर्गत तिरंगा रॅलीचे आयोजन.....!


💥यावेळी तिरंगा रॅलीत सरपंच प्रतिनिधी सोनाजी परडे,भाजपा किसान मोर्चा तालुका अध्यक्ष प्रताप काळेंची प्रमुख उपस्थिती💥 

पुर्णा (दि.१२ आगस्ट) - भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पुर्णा तालुक्यातील धानोरा काळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळे तर्फे आज शुक्रवार दि.१२ आगस्ट २०२२ रोजी तिरंगा रॅलिचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शाळेतील शिक्षक, शिक्षिका ज्येष्ठ नागरिक यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते गावातील मुख्य रस्त्याने तिरंगा रॅली काढण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा ध्वज घेऊन 'हर घर तिरंगा, भारत माता की जय, वंदे मातरम, एक रुपया चांदी का भारत देश गांधी का अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.


     यावेळी तिरंगा रॅलीत सरपंच प्रतिनिधी सोनाजी परडे,भाजपा किसान मोर्चा तालुका अध्यक्ष प्रताप काळे,शिवराम काळे,उद्धव काळे,माऊली काळे,नारायण काळे,हनुमंत काळे, गावातील ज्येष्ठ नागरिक युवक हातात तिरंगा घेऊन उत्स्फूर्त सहभागी होते.                                      तिरंगा रॅली यशस्वी करण्यासाठी शाळेचे शिक्षक पी.डी. डुकरे, ए. ए.डुमणे, व्ही. डी.मेडेवाड , एस.एस.सावळे, एस.बी खोसे, टी.बी.स्वामी, बी.पी.पिलेवाड, सौ.पी. वाय. बांगरे, व्ही.एस. पौल, आर.एस. होळकर. यांनी परिश्रम घेतले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या