💥महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद अभियंता संघटनेच्या राज्याध्यक्षपदी परभणी येथील सुहास धारासूरकर यांची निवड...!


💥तर कार्याध्यक्ष पदावर सतिश मारबदे (भंडारा ) यांची निवड करण्यात आली💥

परभणी (दि.30 आगष्ट) : जिल्हा परिषद अभियंता संघटना महाराष्ट्र (राज्यस्तर) च्या राज्याध्यक्षपदी सुहास धारासूरकर (परभणी), महासचिव पदावर गणेश शिंगणे (यवतमाळ) व कार्याध्यक्ष पदावर सतिश मारबदे (भंडारा ) यांची निवड करण्यात आली.

           जिल्हा परिषद अभियंता संघटना महाराष्ट्र (राज्यस्तर) च्या 28 ऑगस्ट रोजी जालना जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हान सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस राज्यभरातुन 33 जिल्ह्यातुन मोठ्या संख्येने अभियंते उपस्थित होते. यावेळी सुहास धारासूरकर (परभणी) यांची संघटनेच्या राज्याध्यक्ष पदावर बहुमताने निवड करण्यात आली.

              तसेच महासचिव पदावर गणेश शिंगणे (यवतमाळ) व कार्याध्यक्ष पदावर सतिश मारबदे (भंडारा) यांची निवड करण्यात आली. यांच्यासह अन्य पदाधिकार्‍यांच्याही नियुक्त्या करण्यात आल्या असून त्यामध्ये कोषाध्यक्ष  प्रदीप हुपरे (कोल्हापूर), उपाध्यक्ष विष्णू बोरसे (पालघर), किशन साळूंके (सांगली), रामकृष्ण सरोदे (नगर), अजय गौरकर (लातूर), सुरेश दरेकर (अकोला), गोवर्धन बिसेन (गोंदिया), सहकोषाध्यक्ष प्रविण मेटकर (भंडारा), संघटक  रमेश ढगे (रत्नागिरी), मुकेश परदेशी (धुळे), नागेश चौधरी (परभणी), गजानन कांबळे (बुलडाणा), सचिन चव्हान (चंद्रपुर), सहसचिव रविशंकर बोधले (सोलापूर), संजय मंठेकर (हिंगोली), रवि मिरगे (नागपुर), प्रवक्त्ता संजय सदावर्ते (हिंगोली), कालीदास ढवळे (गडचिरोली) सल्लागार संजय उगेमुगे (वर्धा), प्रकाश तांबोळी (नागपुर), संजय कोहाडे (चंद्रपूर), महीला प्रतिनिधी  सौ. हेमा कुळकर्णी (पुणे) कार्यकारिणी सदस्य विक्रांत मेश्राम (गडचिरोली), प्रविण चंदनखेडे (यवतमाळ), नितीन पाटील (नाशिक) आदींच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

             बैठकीच्या समारोप प्रसंगी मनोगत व्यक्त करतांना नवनियुक्त राज्याध्यक्ष सुहास धारासूरकर यांनी, मा.उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार कनिष्ठ अभियंत्यांना नियुक्ती दिनांकापासून बारा वर्षांनी अश्‍वासित प्रगती योजनेचा पहीला लाभ मंजुर करणेचे आदेश तातडीने निर्गमित करणे, राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये कनिष्ठ अभियंता व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यांच्या मोठ्या संख्येने रिक्त असलेल्या जागा तातडीने भरणे, प्रत्येक जिल्हा परिषदेस किमान एक विद्युत उपविभाग निर्माण करणे, मा.उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार मग्रारोहयोच्या कामांमधुन जिल्हा परिषदेच्या अभियंत्यांना तात्काळ मुक्त करणे यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे नमुद केले. नविन कार्यकारिणीच्या निवडीसाठी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन रावसाहेब पाटील, संजय उगेमुगे यांनी काम पाहिले.

            दरम्यान, नवनियुक्त पदाधिकार्‍यांचे संघटनेचे माजी राज्याध्यक्ष विजयसिंह महाडीक, माजी महासचिव व्हि.बी. कुळकर्णी, संजय देसाई, उत्तमराव माने, राजू शिंदे, महेश भदाने यासह परभणी जिल्हा शाखेचे अध्यक्ष मोहन बुरंगे, सचिव तुळशीराम इंगळे, नागेश चौधरी, दिपक श्रीरामवार, नंदकिशोर टणे, कार्यकारी अभियंता धोंडीराम उडानशीवे आदींनी अभिनंदन केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या