💥परभणी तालुक्यातील मौजे धसाडी येथे किसान संघाची ग्रामसभा...!


💥सभेस अखिल भारतीय कार्यकारणी सदस्य कैलास धाकड यांची उपस्थिती💥 

गंगाखेड (दि.२४ आगस्ट) - परभणी तालुक्यातील मौजे धसाडी येथे भारतीय किसान संघाची सभा घेण्यात आली यावेळी गावातील तरुण शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते. सभेस अखिल भारतीय कार्यकारणी सदस्य कैलास धाकड यांची उपस्थिती होती. दादा लाड यांनी उपस्थितांना भारतीय किसान संघाच्या कामाबद्दल माहिती दिली. 

यावेळी बोलताना कैलास धाकड म्हणाले की शेतकरी संघटित होणे गरजेचे आहे. महात्मा गांधीजी चे ग्रामविकासाचे स्वप्न साखर करण्यासाठी प्रथम शेतकरी समृद्ध झाला पाहिजे. तरच गाव समृद्ध हा विचार कार्यकर्त्यांनी समोर ठेवला पाहिजे. असे ते म्हणाले. ही ग्रामसभा यशस्वी करण्यासाठी विष्णु शिंदे, बळीराम शिंदे, बळीराम जाधव,सचिन शिंदे,दिलीप शिंदे, सिद्धेश्वर शिंदे, शिवाजी शिंदे,आदींनी परिश्रम घेतले. शेवटी सामूहिक पसायदान  घेऊन ग्रामसभेची सांगता करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या