💥स्वातंत्र्याचा ७५ व्या अमृत महोत्सवी वर्षातही मागासवर्गीय कुटुंबावर होणारे अत्याचार थांबता थांबना...!


💥जिंतूर तालुक्यातील चामणी गावात बौध्द महिलेचा विनयभंग करीत मारहाण : संपूर्ण कुटुंब दहशतीत आरोपी अद्यापही मोकाट💥

परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातल्या चामणी गावात जातीयवादी गुंड प्रवृत्तीच्या आरोपीतांनी मागासवर्गीय बौध्द समाजातील महिलेला अक्षरशः तोडावर डोळ्यांवर गंभीर स्वरूपाची मारहान करीत त्या अबलेचे डोळे काळे निळे होऊस्तर जखमी करून विनयभंग करीत त्या महिलेच्या कुटुंबाने विकत घेतलेला बैल हिसकावून नेल्याची आहे. या पिडीत कुटुंबाने खरेदी केलेल्या बैलाच्या व्यवहारातून सदरील घटना घडली असून बैल खरेदी व्यवहारातील १५ हजार रुपये राहिले असतांना ३० हजार रुपयांचा बैल हिसकावून नेण्यात आला.

या घटनेतील मागासवर्गीय बौध्द महिला गंभीर जखमी झाली असून या प्रकरणी विनयभंगासह अट्रोसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झाला असतांना देखील घटनेतील जातीयवादी आरोपी मोकाट आहेत. पिडितांना अद्याप पर्यंत पोलीस संरक्षण देण्यात आलेले नाही कुटुंबातील मुलांचा सुद्धा जीव सुध्दा धोक्यात आहे.

💥जितूर तालुक्यातील चामणी घटनेतील 24 तासात आरोपी अटक करून पिडीत कुटुंबाला पोलीस संरक्षण द्या....!

💥15 ऑगस्ट आहे आम्हाला भूमिका घ्यायला भाग पाडू नका : ऑल इंडिया पँथर सेनेने दिला इशारा💥

स्वातंत्र्यता दिवस 15 ऑगस्ट अवघ्या चार दिवसावर आले आहे आम्हाला भूमिका घ्यायला भाग पाडू नका देशात स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव सर्वत्र साजरा केला जात असतांना बौध्द महिलेला रक्तबंबाळ होईपर्यत मारहाण करीत विनयभंग केला जातो संपूर्ण कुटुंबावर दहशत निर्माण केली जाते आमचं स्वतंत्र कुठंय हा प्रश्न कायम आहे. आम्हाला माणूस म्हणून जगू द्या ही आमची मागणी कायम आहे. भारत माता की जय चा नारा गुंजेल देशभर ही दलित बेटी भारत मातेची बेटी तुम्हाला वाटत नाही काय ? असेही ऑल इंडिया पँथर सेनेने म्हटले असून या घटनेचा निषेध केला आहे...


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या