💥बिटींग रिट्रीटने ‘जल्लोष स्वातंत्र्याचा’महोत्सवाचा समारोप....!


💥“जल्लोष स्वातंत्र्याचा” सांकृतिक समारोहाच्या चौथ्या दिवशी सहकार मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन झाले💥


परभणी (दि.14 आगस्ट) : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त “जल्लोष स्वातंत्र्याचा” सांकृतिक समारोहाच्या समारोप बिटींग रिट्रीटपे पार पडला.

जिल्हाधिकारी कार्यलयाच्या वतीने आयोजित “जल्लोष स्वातंत्र्याचा” सांकृतिक समारोहाच्या चौथ्या दिवशी सहकार मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन झाले. यावेळी आ.मेघनाताई बोर्डीकर, जिल्हाधिकारी आंचल गोयल, जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, पोलीस अधिक्षक जयंत मिना, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, नीलकंठ पाचंगे यांची उपस्थिती होती.


यावेळी सहकार मंत्री म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी भारताच्या स्वातंत्र्याल्या 75 वर्ष झाल्यानिमित्त देशाभर मागील एक वर्षापासून अमृत महोत्सव साजरा करत आहोत. यानिमित्त देशभर विविध उपक्रम राबविण्यात आले. याच उपक्रमाअंतर्गत ‘हर घर तिरंगा’ अभियानामुळे आपण आपल्या घरावर आपला राष्ट्रीय ध्वज लावता येत आहे. यानुसार परभणी जिल्ह्यात 4 लाखाहून अधिक राष्ट्रीय ध्वज लावाला हि आपल्या देशासाठी अभिमानास्पद बाब आहे. तसेच संपूर्ण देशामध्ये छोट्या गावापासून मोठ्या शहरापर्यंत तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच या रॅलीमध्ये प्रत्येक समाजाच्या व्यक्तीं सहभागी होत हि तिरंगा रॅली यशस्वी करण्यात आली. आज 14 ऑगस्ट फाळणी दिवस आहे. ज्या स्वातंत्र्य विरांनी या आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी आपल्या जीवाचे बलिदान दिले. त्यांना अदरांजली म्हणुन हा दिवस आपण साजरा करत आहोत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याच्या विकासाच्या प्रत्येक गोष्टी मध्ये लक्ष देत असून येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्राच्या विकासामध्ये शासन कुठे कमी पडणार नाही. परभणी आयोजित जल्लोष स्वातंत्र्याचा सांस्कृतीक कार्यक्रमात ज्या कलाकारांनी सहभाग नोंदविला त्यांचे आणि या समारोहाचे आयोजक जिल्हाधिकारी आंचल गोयल यांचे अभिनंदन करत सर्वांना श्री. सावे यांनी स्वातंत्र्य  दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी आमदार मेघनाताई बोर्डीकर आणि जिल्हाधिकारी यांची समयोचित भाषणे झाली.
“जल्लोष स्वातंत्र्याचा” आजच्या चौथ्या दिवसाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात नटराज ढोल पथकाच्या झांज द्वारे करण्यात आली. यानंतर सारंग स्वामी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी समग्र भारत दर्शन अंतर्गत ‘हम हिंदुस्थानी’ या कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. भारतीय बाल विद्या मंदिर येथील विद्यार्थ्यांनी परभणी गौरव गीत सादर केले. कै. राजाराम बापू कदम गोंधळी कलासंच यांनी गोंधळ सादर केला. तलयात्री प्रतिष्ठान यांनी तबला वादन तर बी रघुनाथ महाविद्यालय यांनी देश रंगरंगीला देशभक्तीपर गीतावर सादरीकरण केले. महसुल विभाग व गुरुमाऊली कलामंच यांनी तामिळनाडू येथील पारंपारीक कवडी आत्तम नृत्यप्रकार सादर केला. तसेच ओयासीस शाळेतील विद्यार्थ्यांनी बिंटीग रिट्रीट सादर केले. तसेच प्रांजल बोधक हिने मेरी मिठ्ठी हे देशभक्तीपर गीत सादर केले.

कार्यक्राचे संचलन प्रेमेंद्र भावसार, सुनिल तुरुकमाने आणि भारत शहाणे यांनी केले. यावेळी लोकप्रतिनीधी, अधिकारी-कर्मचारी, विविध क्षेत्रातील मान्यवर, शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनी, नागरिक, पत्रकार यांची उपस्थिती होती.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या