💥प्रहार जनशक्ती पक्षाच्या आक्रमक भूमिकेला यश....!


💥गणेशोत्सव होईपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज चौकातील कारागिरांना तेथेच काम करण्याची परवानगी💥

परभणी (दि.३० आगष्ट) - शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या दर्ग्याच्या शेजारी मागील अनेक वर्षापासून पिढ्यानपिढ्या तेथे शिलाई मशीन वर छोटी मोठी काम करणाऱ्या कारागिरांची मोठी संख्या आहे परंतु त्यांच्या पिढ्यानपिढ्या सुरू असलेल्या व्यवसायाच्या जागेवर एका गणेश मंडळाने पेंडॉल उभा केल्यामुळे त्या सर्व कारागिरांच्या मशिनी तेथून हलविण्यात आलेल्या आहेत आज सकाळी परभणी शहर महानगर पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने त्यांच्या शिलाई मशीन उचलून नेण्याचा प्रयत्न केला होता.


या प्रकरणांमध्ये मदत मिळावी म्हणून येथील कारागिरांनी आज प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने यांना फोन करून निरोप दिला या फोनची तात्काळ दखल घेत जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने हे छत्रपती शिवाजी महाराज चौकांमध्ये स्वतः दाखल झाले आणि त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला त्यानंतर परभणी शहर महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त व स्वच्छता निरीक्षक यांना  घटनास्थळी बोलावून घेण्यात आले आज झालेल्या या घटनाक्रमाचा प्रहार जनशक्ती पक्षाने निषेध नोंदवला व झलेल्या घटनेबाबत महानगरपालिका पदाधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले व गणेश उत्सव संपेपर्यंत या कारागिरांना गणेश मंडळाच्या पेंडॉल शेजारी असलेल्या मोकळ्या जागेत व्यवसाय करण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी केली  व याबाबत परभणी शहर महानगरपालिकेचे उपायुक्त श्री रणजीत पाटील यांच्याशी फोनवर चर्चा केली. प्रहार जनशक्ती पक्षाचे मागणी परभणी शहर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ मागणी मान्य केली व पुढील अकरा दिवस या कारागिरांना गणेश मंडळाच्या बाजूला असलेल्या रिकाम्या जागी व्यवसाय सुरू ठेवण्यास परवानगी दिली असून या काळामध्ये यांना उठवण्याचा कुठलाही परभणी शहर महानगर पालिकेच्या वतीने करण्यात येणार नाही असा शब्द यावेळी दिला. प्रहार जनशक्ती पक्षाने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे कारागिरांना न्याय मिळाला असून कारागिरांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे आभार मानले आहेत.

या बैठकीस प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हाप्रमुख गजानन चोपडे, परभणी शहर महानगरपालिकेचे सहाय्यक उपायुक्त सय्यद जुबेर हाश्मी व कारागीर मोठ्या संख्येने उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या