💥हिंगोली तालुक्यातील श्रीक्षेत्र नरसी नामदेव येथून जवळच असलेल्या घोटा देवी ते श्रीक्षेत्र शेगाव पायी दिंडीचे प्रस्थान....!


💥दिंडीतील भगवे ध्वज,भगव्या पताका व संत गजानन महाराजांच्या जयघोषाने घोटा देवी येथील वातावरण भक्तीमय झाले💥

* शिवशंकर निरगुडे : हिंगोली

तालुक्यातील श्रीक्षेत्र नरसी नामदेव येथून जवळच असलेल्या घोटा देवी येथील ग्रामस्थ व श्रीक्षेत्र तुळजा देवी संस्थानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील घोटा देवी ते श्रीक्षेत्र शेगाव पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. आज १ ऑगस्ट रोजी    ही पायी दिंडी घोटा देवी येथुन श्रीक्षेत्र शेगावकडे टाळ-मृदंगाच्या निनादात व गण गण गणात बोते.... च्या जयघोषात मार्गस्थ झाली. या पायी दिंडीतील भगवे ध्वज, भगव्या पताका व संत गजानन महाराजांच्या जयघोषाने घोटा देवी येथील वातावरण भक्तीमय झाले होते.

संत नामदेव महाराज यांचे जन्मगाव असलेल्या हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव येथून २ कि.मी. अंतरावर श्रीक्षेत्र घोटा देवी गावात तुळजाभवानी मातेचे मंदिर आहे. आई तुळजाभवानीचे हे मंदिर मराठवाडा व विदर्भासह महाराष्ट्रात प्रसिध्द असून या तुळजाभवानी देवस्थानच्या वतीने दरवर्षी घोटा देवी ते श्रीक्षेत्र शेगाव पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन केले जात आहे. दरम्यान, यावर्षी आज १ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास श्रीक्षेत्र घोटा देवी गावातुन टाळ-मृदंगाच्या निनादात व श्री गजानन जय गजानन...़ च्या जयघोषात ही पायी दिंडी श्रीक्षेत्र शेगावकडे मार्गस्थ झाली. या पायी दिंडीमध्ये शेकडो वाकरी भगवे ध्वज, टाळ-मृदंग, विना घेऊन सहभागी झाले होते. तर महिला वारकरी देखील डोक्यावर तुळस व भगवे ध्वज घेऊन या पायी दिंडीत सहभागी झाल्या आहेत. ही पायी दिंडी श्रीक्षेत्र नरसी नामदेव मार्गे जवळा पळशी, गोरेगाव व त्यापुढे विदर्भात प्रस्थान करणार आहे.   या पायी दिंडीमध्ये हभप शिवाजी महाराज शेळके, गायनाचार्य विजय शेळके, परसराम पावडे, अमोल पावडे, मृदंगाचार्य रामदास पावडे, सुधाकर शेळके, शिवराम पावडे, भगवान शेळके, भिकाजी शेळके, गजानन गायकवाड, राजु गडगिळ, वैâलास शेळके, बबनराव बांगर, विठ्ठल बांगर, जयाजी पातळे, प्रल्हाद शेळके, विष्णु शेळके, विलास शेळके, विठ्ठल शेळके, प्रदीप अंभोरे, रामचंद्र गायकवाड, परसराम शेळके आदींसह महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाल्या आहेत. या पायी दिंडीतील वाकर्‍यांच्या श्री गजानन... जय गजानन, गण...गण... गणात बोते... च्या जयघोषाने घोटा नगरी दुमदुमून गेली होती. घोटा देवी ते श्रीक्षेत्र शेगाव या पायी दिंडी सोहळ्याचे हे ९ वे वर्ष असून कोरोना महामारीनंतर पुन्हा एकदा पायी दिंडी सोहळा शेगावकडे मार्गस्थ झाल्याने दिंडीत सहभागी महिला-पुरुष भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे....,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या