💥पुर्णेत अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त डी वाय एफ कडून गीत-गायन स्पर्धा संपन्न...!


💥गायन स्पर्धेच्या माध्यमातून सांस्कृतिक पर्याय निर्माण करित अण्णाभाऊंचे विचार व कार्य युवकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न💥    

पुर्णा (दि.०९ ऑगस्ट) : पुर्णा तालुका व शहर डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया संघटनेच्या समित्यांकडून अण्णाभाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंती निमित्त गीत-गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. 


     लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांचे जीवन साहित्य व कलेच्या माधम्याने चळवळ करण्यात खर्ची गेले. गरीब, कष्टकरी निम्न जातीवरील होणारे अन्याय अत्याचार आणि त्यांच्या जीवनातील वास्तव त्यांनी लेखणी व गायनाच्या माध्यमातून प्रकट केले. डाव्या चळवळीत काम करतांना त्यांनी शोषितांचे (सामाजिक-आर्थिक) लढे लाल बावटा पथकाच्या माध्यमातून शाहिरीतून मांडले. 

     त्यांच्याच विचारावर चालणाऱ्या डी वाय एफ आय या संघटनेनी गायन स्पर्धेच्या माध्यमातून सांस्कृतिक पर्याय निर्माण करित अण्णाभाऊंचे विचार व कार्य युवकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. या स्पर्धेत श्वेता भगवान दिपके, प्राजक्ता राहुल अहिरे, सविता राहुल अहिरे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिक पटकावले. या विजेत्यांशीवाय गौतम काळे, केशव जाधव आणि मिलिंद उत्तम गवळी यांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली. 

        काही महिन्यांपूर्वी डी वाय एफ आय या युवक संघटनेनी नगर पालिका प्रशासनाकडे पूर्णेत कॉम्रेड अण्णाभाऊ साठे खुला सांस्कृतिक मंच उभारण्याची मागणी केलेली आहे. या माध्यमातून पूर्णेतील युवक-युवती तसेच इतर कलावंतांना त्यांची कलाकृती, साहित्य व इतर विचारमंथन करून अण्णाभाऊसहित इतर महापुरुषांचे विचार व कार्य तसेच सामाजिक प्रशांवर व्यक्त होता येईल असे संघटनेला वाटते.

    डी वाय एफ आय तरुणांच्या प्रश्नांवर तसेच समस्यांवर कायम भाष्य करीत आलेली आहे. त्याचाच भाग म्हणून ही गायन स्पर्धा हा एक उपक्रम आहे. 

         स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी परीक्षक म्हणून प्रा. डॉ. आदिनाथ इंगोले, प्रा. राजेश पर्लेकर, युवा कलाकार संदीप वेडे व डी वाय एफ आय संघटनेचे जिल्हा कमिटी पदाधिकारी नसीर शेख, अमन जोंधळे, क्रांती बुरखुंडे, जय एंगडे, तालुका पदाधिकारी अमृता कुऱ्हे, अजय खंदारे,  आणि शहर पदाधिकारी संग्राम नजान,  किरण खंदारे, वैभव जाधव, राज जोंधळे व सुबोध खंदारे आदींनी श्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूषण भुजबळ यांनी केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या