💥पुर्णा शहरातील लोकमान्य टिळकरोडवर तळीरामांना आता देशी विदेशी दारूसह केमीकलयुक्त ताडीही मिळणार ?


💥टिळकरोड भागात अनधिकृत कागदपत्रांच्या आधारे अधिकृत ताडी (शिंदी) अड्डा सुरु करण्याचा कुटील डाव💥 

पुर्णा (दि.०४ आगस्ट) - शहरातील उच्चभ्रू वसाहतीसह मुख्य बाजारपेठेचा गजबजलेला व वर्दळीचा भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकमान्य टिळक रोड/स्वामी दयानंद सरस्वती चौकासह पुर्णा पोलिस स्थानकाच्या अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या या भागात मागील अनेक दशकापासून असलेल्या शासकीय मान्यताप्राप्त देशी दारू अड्ड्यासह देशी-विदेशी दारू दुकान असल्यामुळे या परिसरातील रहिवासी नागरिक तसेच व्यापारी वर्गाला रात्रंदिवस तळीराम लिलांसह त्यांच्या आरडाओरडा अन् आपआपसातील वादविवादांचा सामना करावा लागतो या भागात अधिकृत कमी आणि अनाधिकृत अर्थात अवैध देशी/विदेशी दारूसह केमीकलयुक्त मानवी शरीरास अपायकारक अलसेल्या बोग ताडी अर्थात शिंदी विक्रेत्यांनी देखील मोठ्या प्रमाणात उच्छाद मांडल्यामुळे पहाटे ०४-०० वाजेपासूनच तळीरामांची परिसरात अक्षरशः जत्रा भरते याही पेक्षा गंभीर बाब म्हणजे या परिसरा लगतच रेल्वे स्थानकासह रेल्वे परिसराचा अत्यंत बदणाम परिसर म्हणून ओळखला जाणारा 'तडीपार एरिया' असल्यामुळे या परिसरात देशी/विदेशी दारूसह ताडी अर्थात शिंदीचा आस्वाद घेण्यासाठी रेल्वे मार्गांवर गुन्हेगारीला आपला जन्मजात व्यवसाय म्हणून अंगीकारलेले राज्यातील तसेच अंतरराज्यातील गुन्हेगारांचे देखील आगमन होत असल्यामुळे या परिसरातून वावरणाऱ्यांसह स्थानिक रहिवासी तसेच व्यापाऱ्यांना फार मोठी डोकेदुखी झाली असतांनाच पुन्हा याच परिसरात नगर परिषद प्रशासनातील भ्रष्ट बेईमान अधिकारी/कर्मचाऱ्यांना हाताशी धरून बोगस कागथदपत्रांच्या आधारे नाहरकत प्रमाणपत्र मिळवून या टिळकरोड मुळ नागरी वसाहतील असलेल्या सुभाष रतनलाल जैयस्वाल यांच्या मालकीच्या घर क्रमांक ३-३-३८ चे भाडेपत्र जोडून शिंदी अर्थात ताडी अड्डा सुरू करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग परभणी यांच्याकडे मागणी करण्यात आलेली असून या अत्यंत गजबजलेल्या नागरी वसाहतीत नगर परिषदेतील भ्रष्ट अधिकारी/कर्मचारी शिंदी ताडी अड्डा चालवण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र देण्याची व राज्य उत्पादन शुल्क विभागातील भ्रष्ट अधिकारी/कर्मचारी आर्थिक हितसंबंध जोपासत अधिकृत परवाना बहाल करण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे या परिसरातील नागरिकांतून प्रचंड संताप व्यक्त होत असून सदरील परवाना बहाल करण्यात आल्यास भविष्यात परिसरासह संपूर्ण शहरात कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे जिल्ह्याच्या सन्माननीय कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी सदरील भागात शिंदी अर्थात ताडी अड्डा सुरू करण्यास देण्यात येणाऱ्या परवान्यावर तात्काळ प्रतिबंद घालावा अशी मागणी होत आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या