💥पाथरी तालुक्यातील मौजे कासापुरी येथे बाळासाहेब ठाकरे ग्रामिण परीवर्तन योजना (स्मार्ट) अंतर्गत शेतीशाळेचे आयोजन....!


💥कापुस पिकावरील शेतीशाळा सुरेश वांढे यांच्या शेतावर बुधवार दि.२४ ऑगष्ट रोजी आयोजन💥

किरण घुंबरे पाटील

 पाथरी:-कृषि विभाग, तालुका कृषि अधिकारी पाथरी मार्फत बाळासाहेब ठाकरे ग्रामिण परीवर्तन योजना ( स्मार्ट) अंतर्गत मौजे कासापुरी येथे कापुस पिकावरील शेतीशाळा सुरेश वांढे यांच्या शेतावर २४ ऑगष्ट बुधवार रोजी  आयोजीत केली होती.

यामध्ये मास्टर ट्रेनर सदाशिव थोरात यांनी कापुस पिकावरील किड रोग एकात्मीक व्यवस्थापन व सेंद्रीय शेती बद्दल माहीती दिली यावेळी तालुका कृषि अधिकारी नांदे व्ही एस, कृषि पर्यवेक्षक शिंदे बि यु, स्मार्टचे उगले एस एस  यांनी स्मार्ट योजना सविस्तर माहीती दिली. परीसरातील शेतकरी यांनी उपस्थीत राहुन खरीप पिके शंका समाधान करुन घेतले. शेतीशाळा च्या माध्यमातुन शेतकरी यांना तांत्रिक ज्ञान प्राप्त होउन शेतीत प्रगती साधता येत आहे. 

यावेळी शरद कोल्हे पं.स. सदस्य, कृषि साहायक खिल्लारी ए. व्ही, प्रगतीशील शेतकरी, जगदीश कोल्हे, श्याम घांडगे, अंगद घांडगे,सुदाम कोल्हे, सुनील कोल्हे, अभिशेक कोल्हे व बहुसंख्य शेतकरी उपस्थीत होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या