💥परभणी जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून आयोजित रक्तदान शिबीर संपन्न....!


💥या शिबीरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनीही रक्तदान केले💥

परभणी (दि.१४ आगस्ट) - स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त आज रविवारी दि.१४ आगस्ट २०२२ रोजी पोलीस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे, (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड परिक्षेत्र,नांदेड ) यांचे मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभाग परभणी चे पोलीस उप अधीक्षक किरण बिडवे यांनी केलेल्या नियोजन नुसार लाप्रवि परभणी व न्यू लाइफ ब्लड बँक परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग परभणी येथील पोलीस अधिकारी श्री. बसवेश्वर जकिकोरे व पोलीस अंमलदार श्री. चंद्रशेखर निलपत्रेवार, श्री.अनिल कटारे, श्री.शेख मुखिद, श्री.अतुल कदम यांनी रक्तदान केले....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या