💥पाथरी येथील स्व नितीन महाविद्यालयाच्या सभागृहात रासेयो कडून आजादी का अमृतमोहत्सव अंतर्गत बैठकीचे आयोजन...!


💥या वेळी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राम फुन्ने हे होते💥 

पाथरी (दि.०४ आगस्ट) : येथील स्व नितीन महाविद्यालयाच्या सभागृहात रासेयो विभागाच्या वतीने आजादी का अमृतमहोत्सव अंतर्गत "घरोघरी तिरंगा" उपक्रम राबवण्या साठी गुरूवार ४ ऑगष्ट रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.


या वेळी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राम फुन्ने हे होते तर प्रमुख उपस्थितीत उप प्राचार्य प्रा डॉ सुरेश सामाले,परिक्षा विभाग प्रमुख प्रा डॉ आर एम जाधव,प्रा डॉ जी जे मोरे,रासेयो विभाग प्रमुख प्रा तुळशिदास काळे,प्रा डॉ अर्चना बदने यांची उपस्थिती होती.

या वेळी रासेयो विभाग प्रमुख प्रा तुळशिदास काळे यांनी महाविद्यालयाच्या वतीने "घरोघरी तिरंगा" हा उपक्रम महाविद्यालयातील कर्मचा-यांनी नेमका कशा प्रकारे राबऊन प्रत्येकाने स्वत:च्या घरा सह इतरांना ही घरावर ध्वज लावण्या साठी प्रवृत्त करत या विषयीची ध्वज संहिता समजाऊन सांगण्यात आली १३ ते १५  ऑगष्ट दरम्यान घरोघरी तिरंगा उपक्रम राबवण्यात येत आहे. या विषयी जनजागृती करून महाविद्यालया मार्फत तिरंग्याचे वाटप ही करण्यात येणार आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या