💥गौरी-गणपती सणा निमित्त जिंतुरची बाजारपेठ गजबजली.....!


💥जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढल्याने सण साजरे करताना जनसामान्यांच्या खिशाला बसणार झळ💥 

जिंतूर प्रतिनिधी / बि.डी. रामपूरकर 

जिंतूर (दि.२८ आगष्ट) - गौरी-गणपतीच्या सणामुळे जिंतुरची बाजारपेठ गजबजली असली, तरी जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढल्याने सण साजरे करताना खिशाला झळ बसत आहे.

मागील दोनवर्षीपासून कोरोना महामारीमुळे विविध सण-उत्सव साजरे करताना अनेक बंधने आली. परंतु, गौरी-गणपती हा सर्वांत मोठा समजला जाणारा सण असल्याने नागरिक मोठ्या संख्येने खरेदीसाठी घराबाहेर पडल्याचे पाहावयास मिळाले. आशा परिस्थितीत खाद्यतेल, शेंगदाणे, रवा, तूप यासह इतर वस्तू तसेच गॅसचे देखील दर वाढल्याने सण साजरे करताना खिशाला मोठी झळ बसत आहे.

अलीकडच्या काळात गौरी- गणपतीसमोर नैवेद्य म्हणून ठेवल्या जाणाऱ्या बेसन लाडू, बुंदी लाडू, चकली, आदी फराळाचे प्रदार्थ रेडिमेड खरेदी करण्यावर नागरिकांचा भर दिसून येत आहे. तसेच रांगोळी, गौरीचे अलंकार,  गौरी मुकुट, हात, कोथळी, मखर, पडदे,आरासाचे सामान, विविध प्रकारची  खरेदीसाठी देखील बाजारात गर्दी दिसून आली. लक्ष्मी आरासाचे साहित्य, सुवासिक अत्तर, रेडिमेड फराळ, लक्ष्मी मुखवटे, कोथळे, विविध प्रकारच्या लायटिंग, आदींच्या दुकानात देखील  मोठी गर्दी होत आहे.

💥सजावट साहित्यासह फुले हारांच्याही किमती वाढल्या :-

यंदा पाऊस अधिक झाल्याने फुलांची आवक घटली आहे. सणासुदीच्या काळात फुले, गजरा, हार यांची मागणी वाढल्याने किमतीत देखील वाढ झाली आहे. त्यामुळे फुले, हार खरेदी करताना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या