💥परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात क्रांतिसिंह नाना पाटील यांना अभिवादन.....!


💥जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले💥

परभणी (दि.03 आगस्ट) :  क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

          याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, अतिरिक्त पोलिस अधिक्षक सुदर्शन मुम्मका, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, मनपा आयुक्त देविदास पवार, यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी यांनीही क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या