💥एकदिवसीय आरोग्य सुविधा केंद्राचा आज पासून दत्तोबा संस्थानात होणार शुभारंभ....!


💥ह.भ.प.रोहिदास महाराज मस्के यांच्या हस्ते होणार शुभारंभ💥

गंगाखेड (दि.११ आगस्ट) - दत्तोबा संस्थान दत्तवाडी या ठिकाणी दर गुरुवारी सुरू राहील अशा एकदिवशीय आरोग्य सुविधा केंद्राचा शुभारंभ उद्या 11 ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता ह.भ.प.रोहिदास महाराज मस्के यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती संस्थांनचे मठाधिपती नागनाथ महाराज पुरी यांनी दिली.

 गंगाखेड तालुक्यातील शंकरवाडी ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या दत्तवाडी या ठिकाणी प्रसिद्ध दत्तोबा संस्थान आहे. या दत्तोबा संस्थानात दर गुरुवारी आरती साठी हजारो भाविक भक्त जमा होत असतात. या भाविक-भक्तांना दर्शनासाठी आल्यानंतर आरोग्य सुविधाही उपलब्ध व्हाव्यात यासाठी सखाराम बोबडे पडेगावकर यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करून या ठिकाणी एकदिवसीय मोफत आरोग्य सुविधा केंद्र उभारण्यात यावे अशी मागणी केली होती. याला आरोग्य विभागाने मंजुरी दिली असून 11 ऑगस्ट गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता या मोफत आरोग्य सुविधा केंद्राचा शुभारंभ होत आहे. वारकरी संप्रदायाचे वैभव ह भ प रोहिदास महाराज मस्के यांच्या हस्ते या आरोग्य सुविधा केंद्राचे उद्घाटन होणार असून यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ यु बी बिराजदार, महातपूरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ ठुले मॅडम आदीसह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या  सोहळ्यास आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन दत्तोबा संस्थानचे मठाधिपती ह भ प नागनाथ महाराज पुरी व ग्रामपंचायत कार्यालय शंकरवाडी यांनी केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या