💥स्वामुक्टाच्या केंद्रीय सचिवपदी पवार महाविद्यालयातील डाॅ.विजय भोपाळे यांची सर्वानुमते निवड...!


💥तर अध्यक्षपदी डॉ सूर्यकांत जोगदंड यांची निवड💥 

पूर्णा (दि.२८ आगष्ट) -  नांदेड येथे महाराष्ट्र प्राध्यापक महासंघ संलग्नित स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड महाविद्यालयीन प्राध्यापक संघटनेच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक आज रविवार दि.२८ ऑगस्ट २०२२ रोजी घेण्यात आली. या बैठकीत केंद्रीय कार्यकारिणीच्या सचिवपदी पूर्णा येथील स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ विजय भोपाळे यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली आहे तर अध्यक्षपदी डॉ सूर्यकांत जोगदंड यांची निवड झाली आहे. 

या निवडीला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अंतर्गत चारही  जिल्ह्यातील कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित होते. कार्यकारिणीची बैठक नांदेड येथील सायन्स महाविद्यालयात घेण्यात आली होती.  या बैठकीत सर्वांच्या सहमतीने डॉ विजय भोपाळे यांची केंद्रीय सचिवपदी निवड करताना प्राध्यापक संघटनेचा एक आक्रमक भूमिका घेणारा कार्यकर्ता म्हणून डॉ विजय भोपाळे यांची ओळख राहिलेली आहे. यापुढेही ते प्राध्यापकांच्या समस्या आग्रक्रमाने सोडवतील असा विश्वास ठेवून त्यांची सचिवपदी निवड करण्यात आली आहे. तर कार्यकारिणीच्या उपाध्यक्षपदी डॉ. डी.एन. मोरे व प्रा डी.आर.भुरे, कोषाध्यक्षपदी प्रा.डॉ.दिलीप पाईकराव , सह-सचिवपदी डॉ. गोपाळ मोघे, सदस्यपदी डाॅ. करूणा देशमुख, डाॅ. सुनील व्यवहारे, डाॅ.रावसाहेब इंगळे,उ डॉ. यादव एस.आर यांचीही सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. या  निवडीच्या महत्त्वपूर्ण बैठकीला विद्यापीठातांर्गत चारही जिल्ह्यांतील कार्यकारिणीचे अध्यक्ष,सचिव व सदस्य उपस्थित होते.प्रा.डॉ. विजय भोपाळे यांच्या या निवडीबद्दल संस्थेचे संस्थापक सचिव प्रोफेसर डॉ. रामेश्वर पवार, अध्यक्ष गुलाबराव कदम, प्रभारी प्राचार्य डॉ संतोष कुऱ्हे तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी आदींनी त्यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या  या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या